कर्नाटक काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काही तासातच माजी कॅबिनेटमंत्री भाजपमध्ये

गेल्या तीन वर्षापासून उड्डपी जिल्हा काँग्रेस समितीत मला खूप वाईट अनुभव आला.
Pramod Madhwaraj
Pramod Madhwarajsarkarnama

नवी दिल्ली : कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री प्रमोद माधवराज (Pramod Madhwaraj) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासातच भाजपमध्ये प्रवेश केला. (Pramod Madhwaraj latest news)

शनिवारी त्यांनी आपला राजीनामा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याकडं पाठवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

माधवराज यांना काँग्रेसनं नुकतंच कर्नाटक काँग्रेसचं (Karnataka Congress) उपाध्यक्षपद दिलं होतं. पण हे पद आपल्याला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला.

Pramod Madhwaraj
IAS पूजा सिंघल ईडीच्या ताब्यात ; १९ कोटीचं सापडलं घबाड, अधिकारीही चक्रावले !

गेल्या तीन वर्षापासून उड्डपी जिल्हा काँग्रेस समितीत मला खूप वाईट अनुभव आला. याबाबत मी केलेल्या तक्रारींची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली नसल्याचे माधवराज यांनी सांगितले.

भाजपमध्ये सहभागी होण्यापूर्वी माधवराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं आहे. प्रमोद माधवराज हे कोळी समाजातील आहेत. ते 2013 मध्ये कर्नाटकच्या उडुपी मतदारसंघातून आमदार झाले आहेत.

Pramod Madhwaraj
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

कोण आहेत प्रमोद माधवराज

  • प्रमोद माधवराज यांना 2016 मध्ये काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये (Siddaramaiah Government) कॅबिनेट मंत्री करण्यात आलं होतं.

  • त्यांना युवक, क्रीडा आणि मत्स्यव्यवसाय खातं देण्यात आलं होतं. या सरकारमध्ये ते कर्नाटकचे दहावे सर्वोच्च मंत्री होते.

  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते जनता दलमध्ये सामील झाले होते. परंतु, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांच्या जागेसाठी प्रचार केला.

  • जेडीएसची काँग्रेसशी युती असताना त्यांनी उडुपी-चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या शोभा करंदलाजे यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्याठिकाणी ते पराभूत झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com