राज ठाकरेंनंतर मोहित कंबोज यांचेही मशिदींवरील भोग्यांकडे बोट

Raj Thackeray| Mohit Kamboj| प्रार्थनेला विरोध नाही, पण मस्जिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील
राज ठाकरेंनंतर मोहित कंबोज यांचेही मशिदींवरील भोग्यांकडे बोट

मुंबई : आम्ही कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेच्या विरोधात नाही. अजान व्हायला हवी परंतु अनधिकृत लाऊडस्पीकर वर नको. अनधिकृत लाऊडस्पीकर काढावे हे वारंवार कोर्टाने पण सांगितले आहे. यावर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कारवाई करावी आणि हे लाऊडस्पीकर काढावे, अशी मागणी भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे.

कोरोना (Covid 19) संसर्गाची लाट ओसरल्यानंतर शनिवारी (२ एप्रिल) दोन वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुंबईच्या शिवाजी पार्कवर गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळावा आज पार पडला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या वेळी मनसैनिकांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरेंनंतर मोहित कंबोज यांचेही मशिदींवरील भोग्यांकडे बोट
बंद पडलेल्या भीमा-पाटस कारखान्याबाबत अजितदादाचं मोठं विधान

माझी पंतप्रधानांना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता आहात ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मस्जिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मस्जिदींवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही राज यांनी दिला.

त्यानंतर आज पुन्हा मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची मागणी लावून धरत राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. मुंबईमध्ये आता 5 वेळा हनुमान चालीसा ऐकणार आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मी आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत लाऊडस्पीकरवर होणाऱ्या अजानविषयी आपली भूमिका मांडत आहे. याला देखील राज ठाकरे यांनी जी ठाम भूमिका मांडली यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. संजय पांडे यांनी ध्वनी प्रदूषणाची हाती घेतलेली मोहीम पुढे करीत हे अनधिकृत लाऊडस्पीकर काढावे, अशी मागणी आम्ही करीत आहोत.

तर हिंदुवत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेने आपली या विषयी भूमिका स्पष्ट करायला हवी. दुतोंडीपणा न करता मुख्यमंत्र्यांनी आपण कोणत्या बाजूने आहे हे स्पष्ट करावे. बाळासाहेब ठाकरे यांची झलक राज ठाकरे यांच्यामध्ये सगळ्यांनी पहिली. शिवसेनेने आता आपले मत द्यावे संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर शरद पवारांचे असून ते सांगतात तसे बोलतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच आता यावर स्पष्ट बोलावे, अशीही मागणी मोहित कंबोज यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com