
Mumbai Politics News: मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यानंतर भाजपकडून (BJP) ट्विट करीत राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामध्ये बालबुद्धी राहुल गांधींनी सांगावे, याच मुंबईतील अदानी समुहाला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड काँग्रेसने का दिले ? व अदानी समूहाला २०१४ पूर्वी काँग्रेस सरकार कडून कोणकोणते पुरस्कार दिले आहेत हे जनतेला कळले पाहिजे, असा सवाल भाजपने उपस्थित केला.
त्यासोबतच राहुल गांधीनी (Rahul Gandhi) खालील गोष्टींचा खुलासा करावा, असे म्हणत राहुल गांधी यांचे जिजाजी, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रॉ आणि उद्योगपती अदानी यांचे संबंध काय आहेत ? , कोणत्या प्रकल्पावर काम करत आहेत ?, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि उद्योगपती अदानी एकमेकांना का भेटले ?, अशोक गेहलोत, गौतम अदानी सोबत काय करत आहेत ?, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे आणि उद्योगपती अदानी यांचे काय संबंध आहेत ? ते का वारंवार गौतम अदानी भेटीला जातात ?,
काँग्रेसच्या (Congress) मनमोहन सिंग सरकारने आदणीला समुहाला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. २०१०-११ साठी मनमोहन सिंग सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्प-युनिट-१ त्वरित पूर्ण केल्याबद्दल गोल्ड शील्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०१३, ऊर्जा मंत्रालय, मनमोहन सिंग सरकारकडून देण्यात आला, असे सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे आहेत.
त्यासोबतच २०१३ मध्ये याच काँग्रेसच्या कर्नाटकमधील सिद्धरमय्या सरकारने सर्वश्रेष्ठ सुरक्षित पॉवर बॉयलर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासह अनेक पुरस्कार याच काँग्रेसने अदानी समूहाला दिलेले आहेत. ज्यांना व्यक्तीला NCC चा फुलफॉर्म माहिती नाही, तो व्यक्ती देशाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, बेरोजगारीबद्दल ज्ञान पाजळतो. ज्या व्यक्तीला देशाचे ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत समजून घ्यायला २८ सेकंद लागतात तो व्यक्ती आज वाट्टेल तसे आरोप करत आहे, अशा शब्दांत भाजपने राहुल गांधी यांना फटकारले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.