पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी 'क्लिनचिट' दिल्याने संजय राठोडांचे 'कमबॅक'?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते. यामुळे तत्कालीन वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
after pooja chavan parents clean chit sajay rathod may be inducted in cabinet
after pooja chavan parents clean chit sajay rathod may be inducted in cabinet

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chvan) आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते. यामुळे तत्कालीन वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे (Pune Police) जबाब नोंदवला आहे. या जबाबामुळे राठोड यांना क्लिनचिट मिळाल्याचे मानले जात असून, त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुण्यातील वानवडीजवळील महंमदवाडी येथे 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन  उडी मारून  तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवड़ी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर वानवडी पोलिसांकडून पुढील तपासात कोणताही प्रगती झालेली नव्हती. या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर वानवडी पोलिसांकडून केवळ तपास सुरु असल्याचे उत्तर दिले जात होते. आता पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे. 

वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पूजाच्या आई-वडिलांना पुण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. तसेच, पूजाच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचेही त्यांनी जबाबात स्पष्ट केले. पूजाचा आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने मोठा गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सरकारला लक्ष्य केले होते. विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. यामुळे नाईलाजाने कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री ठाकरेंना राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांच्या जबाबात राठोड यांना क्लिनचिट दिल्याने राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजपने या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. विशेषत: या प्रकरणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर सांगू नये, अशी तंबीही पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com