Sharad Pawar Retirement : पवारांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन मागं

Ajit Pawar : कार्यकर्त्यांपर्यंत अजित पवारांनी पोहचवला पवारांचा 'सांगावा'
Ajit Pawar with NCP Activist
Ajit Pawar with NCP ActivistSarkarnama

Sharad Pawar and NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर आले.

दरम्यान, जोपर्यंत पवारसाहेब आपला निर्णय बदलणार नाहीत तोपर्यंत आम्ही अन्नपाण्याशिवाय आंदोलन करणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाय.बी. चव्हाण सेंटर परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

Ajit Pawar with NCP Activist
Ajit Pawar News : राजीनामा सत्र थांबवा, कुणाचेही मंजूर होणार नाहीत; अजित पवारांनी केले स्पष्ट !

निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. मात्र कार्यकर्त्यांनी अन्नपाण्याशिवाय आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांची कार्यकर्त्यांप्रति असलेली भावना आंदोलकांपर्यंत पोहचवली. खासदार सुळे यांनी फोनवरून पावार आणि आंदोलन कार्यकर्त्यांचा संवाद घडवून आणला. त्यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांनी माघार घेण्याची तयारी दाखविली नाही.

Ajit Pawar with NCP Activist
Sharad Pawar News : पवारांनी निर्णयावर विचार करायला मागितला दोन-तीन दिवसांचा वेळ : अजित पवारांची माहिती

दरम्यान, सिल्व्हर ओकवर पावर, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री भुजबळ, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याशी चर्चा केली. तसेच कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखून आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी गेले पाहिजे, अशी अट ठेवली. त्यांचे म्हणणे कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी अजित पवार, खासदार सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार हे पुन्हा आंदोलकांकडे आले. त्यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांचा निरोप सांगितला.

Ajit Pawar with NCP Activist
Saroj Patil On Sharad Pawar Retirement: अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पवारांना त्यांच्या बहिणीने दिला हा सल्ला…

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "पवारसांहेबांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी हट्टीपणा केलेला चलणार नाही. त्यांच्यापेक्षा मी जास्त हट्टी आहे. माझा निर्णय मी दिलेला आहे. मात्र, आता मला फेरविचार करायला दोन ते तीन दिवस लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आता कुणीही उपाशी राहू नये. त्यानंतर सर्वांनी आपापल्या घरी जावे, अशी विनंती पावरसाहेबांनी केली आहे." शरद पवारांच्या या आवाहनास प्रतिसाद देत आंदोलक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते आंदोलन स्थळावरून उठले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com