'काय झाडी.. काय डोंगार..' नंतर आता शहाजीबापूंना 'झुणका भाकरी'ची भुरळ!

Shahaji Bapu Patil : भौतिक सुविधेतही झुणका-भाकर खाण्याचं वेगळेच समाधान.
'काय झाडी.. काय डोंगार..' नंतर आता शहाजीबापूंना 'झुणका भाकरी'ची भुरळ!

मुंबई : गुहाहाटीमधून आपल्या समर्थक कार्यकर्त्याशी फोनवरून संवाद साधताना घडलेल्या 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल' या आपल्या एका डॉयलॉगमुळे महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पोहचलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची एक फेसबुक पोस्ट पुन्हा चर्चेच आली आहे. जळगाव ते मुंबई प्रवासादरम्यान शहाजीबापू यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

शहाजीबापू हे जळगाव ते मुंबई असा प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांनी झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमधून शहाजीबापू म्हणतात की, "आपल्या अस्सल झुणका-भाकरीची चव जर या भौतिक सुविधेतही मिळाली, तर त्याची सर कशालाच नाही, जळगाव-मुंबई प्रवासात आज झुणका-भाकर खाण्याचं समाधान वेगळेच होते." भौतिक सोयींचा उपभोग घेत असतानाही मराठमोळी खाद्यसंस्कृतीला विसरता कामा नये, असे अप्रत्यक्षपणे शहाजीबापूंनी नमूद केले आहे. या फेसबुक पोस्टमध्ये शहाजीबापूंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केले आहे.

'काय झाडी.. काय डोंगार..' नंतर आता शहाजीबापूंना 'झुणका भाकरी'ची भुरळ!
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी होणार 'लाईव्ह'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार गुजरामधील सुरत येथून गुवाहाटी येथे दाखल झाले होते. ब्ल्यू रेडीसन हॉटेलमध्ये आमदारांनी तळ ठोकला होता. यामध्ये आमदार शहाजीबापू पाटील देखील होते. या दरम्यान शहाजीबापू यांचे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यासोबत झालेला संवाद समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. 'आम्ही सध्या गुहाहाटीत आहोत. काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल.. एकदम ओके मध्ये हाय.' हा शहाजीबापूंचा डॉयलॉग महाराष्ट्रभर गाजला होता.

दरम्यान त्यांच्या याच डॉयलॉगचा आधार घेत विरोधकांनी 'पन्नास खोके, एकदम ओके' ही घोषणा दिली होती. विधानभवनाच्या पायऱ्यांवर 'पन्नास खोके, एकदम ओके' ही घोषणा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in