माझं बोलणं झाल्यावर राहुल गांधींनी 'तो' मुद्दा टाळला; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले...

Uddhav Thackeray : बाप हा बाप असतो...
Uddhav Thackeray & Rahul Gandhi Latest News
Uddhav Thackeray & Rahul Gandhi Latest NewsSarkarnama

मुंबई : ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही त्यांना राज्यपाल म्हणून बसवलं आहे. महाराज नसते तर कोश्यारी कुठल्या वेश्यात असते. खोके सरकारमुळे महाराष्ट्राची अवहेलना सुरू असून कुणीही याव आणि टपली मारावी, असी अवस्था हल्ली राज्याची झाली आहे. मात्र शिवसेना जे करायचे ते करून दाखवणारच, असे म्हणत ठाकरे यांनी येत्या दोन दिवसात महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे.

दरम्यान,काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राज्यात भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर देखील आपलं स्पष्ट मत व्यक्त केले आहे. (Uddhav Thackeray & Rahul Gandhi Latest News)

Uddhav Thackeray & Rahul Gandhi Latest News
आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले; अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले...

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असून राहुल यांच्याविरोधात भाजप, मनसे आणि शिंदे गटाकडून निदर्शने देखील करण्यात आली होती. यावरून शिवसेनेने (Shivsena) देखील त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही आज आपली स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. ते म्हणाले, राहुल गांधींनी सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांच्याशी बोललो त्यानंतर त्यांनी तो मुद्दा टाळला. मात्र शिवाजी महाराजांचा अपमान होत असतांना हे त्यांच्या अंगावर जात नाहीत?,असा थेट सवाल करत ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र डागलं. ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आणि भाजप, शिंदे गटाला विविध मुद्द्यावरून लक्ष केलं.

Uddhav Thackeray & Rahul Gandhi Latest News
राज्यपालांना वृद्धाश्रमात पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद आंदोलन : ठाकरेंचा इशारा

ठाकरे म्हणाले, हल्ली खोके सरकारमुळे राज्याची अवहेलना होत आहे. कुणीही राज्याचा अपमान करत आहे. मात्र शिवसेना यावर गप्प बसणार नाही. आम्हाला जे करायचे ते आम्ही करून दाखवणारच आणि येत्या दोन दिवसात शिवप्रेमींनी एकत्र याव म्हणत महाराष्ट्र बंदचेही पाहू, असे म्हणत त्यांनी बंदचा इशाराही दिला.

तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचाही जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, हे अॅमेझॅानचे पार्सल केंद्र सरकारने परत न्यावे. अन्यथा आम्ही परत पाठवू. बाप हा बाप असतो त्यामध्ये नवं जुन असं काही नसतं, महाराज नसते तर आज कोश्यारी कुठल्या वेशात आले असते?, अशा थेट शब्दात ठाकरेंनी राज्यापालांवर घणाघात केला.

Uddhav Thackeray & Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi : राहुल गांधी प्रतापगड किल्ल्यास भेट देणार

दरम्यान, राहुल गांधींनी सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्यावर भाजप, मनसे आणि शिंदे गटाने जोरदार टीका आणि विरोधात जोरदार निदर्शने केली होती. तेव्हा शिवसेनेने देखील यावर आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी शेगाव येथे झालेल्या जंगी सभेत सावरकरांवर बोलणं टाळलं होतं. तोच दाखला देत ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत माझं राहुल गांधी यांच्याशी बोलणं झाल्यावर त्यांनी त्या मुद्द्यावर बोलणं टाळल असल्याचे सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in