सदावर्ते अडकताच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील गायब; पोलीस संरक्षणही सोडलं!

गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या आता गायब झाल्या आहेत.
Jayashree Patil
Jayashree PatilANI

मुंबई : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चार दिवसांची म्हणजेच १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. यातच सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) या गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मुंबई पोलिसांनी पुरवलेलं संरक्षणही सोडून दिलं आहे. आता त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांना अटक झाली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध घेण्यात येत आहे. सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 9 एप्रिलला जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडलं होतं. यामुळे मुंबई पोलिसांचे संरक्षण त्यांनी का सोडलं, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पाटील यांच्याशी कोणताही संपर्क होत नसून त्यांचा मोबाईलही बंद आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Jayashree Patil
..तर ही वेळ आली नसती! पवारांच्या समोरच खडसेंचे गृहमंत्री वळसे-पाटलांना खडे बोल

गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी पाटील पोलीस संरक्षण सोडलं. सदावर्ते यांना 9 एप्रिलला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं होतं. सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरात यांनी न्यायालयात जयश्री पाटील यांचे नाव घेतल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. आता मुंबई पोलिसांनी पाटील यांचा शोध सुरु केला आहे.

Jayashree Patil
ग्रामविकास मंत्र्यांना अडकवण्याच्या कटाचा सूत्रधार 'महानायक'; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, सदावर्ते यांना मुंबईतून ताब्यात घेऊन सातारा पोलिस काल (ता.14) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान, साताऱ्यात दाखल झाले. त्यांना आणण्यात येणाऱ्या मार्गावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, सातारा शहर पोलीस ठाण्याचा रस्ता इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. पोलीस ठाण्यात आणल्यावर सदावर्ते यांनी हात उंचावून घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी केली. खासदार उदयनराजे भोसले (Udayanaje Bhosle) व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सदावर्ते यांच्यावर 2020 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com