राजकारण तापलं! डिस्चार्जनंतर राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणणार?

Ravi Rana | Navneet Rana | दिल्ली दौऱ्यात उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेणार?
Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Shivsena Latest News
Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Shivsena Latest NewsSarkarnama

Ravi Rana | Navneet Rana |

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र बुधवार (४ मे) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. मागील तेरा दिवसांपासून दोघेही तुरुंगात होते. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. (Navneet Rana Latest News)

दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर खासदार राणा यांना मानदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी तुरूंगातून बाहेर येताच त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून आज संध्याकाळी किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

दिल्लीत जावून नवनीत राणा या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राणा यांंनी यापूर्वी आपल्या वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. यात आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात पाणीही देण्यात आले नाही. आपला छळ केल्याचा आरोप राणांनी केला आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळा राजकारण तापलं होतं.

Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Shivsena Latest News
UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाचे कुलगुरु ५ लाखांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात

लोकसभा अध्यक्षांशिवाय राणा दाम्पत्य गृहमंत्री अमित शहा आणि गृहसचिवांची यांची भेट घेवून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सुरक्षा प्राप्त आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणण्याची शक्यता आहे. यावर आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

राणांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा :

दरम्यान, प्रथमदर्शनी राणा दाम्पत्यावरील हे राजद्रोहाचे कलमच चुकीचे असल्याचे मत मुंबई सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. तसेच राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे. न्यायमुर्ती राहुल रोकडे यांनी दिलेल्या जामीन निकालाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली आहे. याच निकालात न्यायालयाने राजद्रोहाच्या कलमावरुन राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. (Ravi Rana Latest News)

न्यायालयाने आपल्या निकालात काही निरीक्षण नोंंदवले आहेत. अशाप्रकारे एखाद्यावर थेट राजद्रोहाचा आरोप करणे चुकीचे आहे आणि या प्रकरणात १२४ अ कलम लागू होत नाही. तसेच पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस दिल्यानंतर त्यांनी आपले खार येथील निवासस्थान सोडले नव्हते आणि त्यांनी आपले आंदोलन देखील मागे घेतले होते. त्यानंतर अशा प्रकारे एखाद्यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे असे मत नोंदवण्यात आले आहे. (Matoshree And Shivsena)

Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Shivsena Latest News
इचलकरंजी महापालिकेची दशकभराची मागणी २ वर्षांत पूर्ण! खासदार मानेंचा निर्णायक पाठपुरावा

तसेच असे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत ज्यात राणा दाम्पत्यांनी आपले आंदोलन करतेवेळी कोणाला मातोश्रीबाहेर बोलवून घेतले होते, किंवा त्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे हिंसा निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर दाखल केलेले कलम चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही या दोघांना जामिन मंजूर करत आहे, असेही न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता राणा दाम्पत्यावरील हे कलम रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप न्यायालयाने त्याबाबतचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com