राऊतांविरोधात तक्रार दाखल करताच सोमय्यांनी घेतली फडणवीसांची भेट

Kirit Somaiya| Devendra Fadanvis| संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला.
राऊतांविरोधात तक्रार दाखल करताच सोमय्यांनी  घेतली फडणवीसांची भेट
Devendra Fadanvis|Kirit Somaiya|Sarkarnama

Kirit Somaiya on Sanjay Raut

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मेधा सोमय्या (Medha Somaiya) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले होते. संजय राऊतांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचं सांगत मेधा सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात आज संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी किरीट सोमय्यादेखील उपस्थित होते.

पोलीस आयुक्तांनी प्रत्येक घटनेचे एफआयआर नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे यावेळी सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, राऊतांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सोमय्या यांनी तातडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Devendra Fadanvis|Kirit Somaiya|
राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत; न्यायालयाने बजावली नोटीस

दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या ३५ वर्षापासून मेधा सोमय्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पण संजय राऊत यांनी त्यांची बदनामी केली. सोमय्या कुटूंंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल झालाच पाहिजे, असंही सोमय्यां म्हणाले.

संजय राऊत यांनी आमच्यावर 100 कोटींचा टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला. पण 100 पैशाचा घोटाळा तरी दाखवा, असे आव्हान मी संजय राऊतांना दिले आहे. राऊतांवर क्रिमिनल अॅक्शन घ्या. राऊतांविरोधात एफआयआर दाखल केला नाही तर मी पुढच्या आठवड्यात क्रिमिनिल डिफिमेशनची केस नोंदवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.