फडणवीसांनंतर आता रावसाहेब दावनेही म्हणतात, बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो...

Raosaheb Danve| Shivsena| Cm Uddhav Thackeray| ज्या पक्षाने शिवसेना भाजपाला कायम शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात.
Raosaheb Danve
Raosaheb Danve

Raosaheb Danve Latest news

मुंबई : ''एक मे रोजी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस, मुंबई स्वतंत्र करणार, असल्याचे त्यांच्या मालकांचे म्हणणे असल्याचे ते बोलून गेले. पण तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. जो कोणी या मुंबईला वेगळा करायचा प्रयत्न करेल त्याचे तुकडेतुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालच्या जाहीर सभेत भाजपला (BJP) दिला.

त्यानंतर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. “तुमच्या हिंदुत्वाचे प्रमाणपत्र आता देण्याची गरज नाही. तुम्ही सांगता की, आम्ही हिंदुत्व नाही तर भाजपाला सोडले यावरुनच तुम्ही हिंदुत्व सोडल्याचेच सिद्ध होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे म्हणण्याची कधीही वेळ आली नाही. ज्या पक्षाने शिवसेना भाजपाला कायम शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात. आता सभा घेऊन हिंदुत्वाच्या गप्पा मारणे आता बंद करा. बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. एकही शिवसैनिक तिथे नव्हता,” असेही दानवे म्हणाले.

Raosaheb Danve
'अरे छट हा तर निघाला... आणखी एक टोमणे बॉम्ब!'

“मुंबई तोडण्याची भाषा झाली तेव्हा बलिदान देण्यामध्ये हेच फक्त होते, असं काही नाही. तेव्हा सगळा महाराष्ट्र पेटून उठला होता. कोणाचाही मुंबईला तोडण्याचा हेतू नाही. मुंबई अभेद्य राहील. पण जेव्हा जेव्हा मुंबईवर संकटे येतील तेव्हा पक्षभेद विसरुन आम्ही सर्व एकत्र येऊ,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

मुंख्यमंत्र्यांच्या सभेबद्दल जनतेला खूप उत्सुकता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने सर्वांची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून राज्य सरकार काय करत आहे आणि काय करणार आहे, राज्याची सध्याची स्थिती काय आहे, अशा प्रकारची वक्तव्ये यायला हवी होती. पण मुख्यमंत्र्यांनी विकासाची चर्चा न करता, राज्यातल्या जनतेला कोणतीही घोषणा न करता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केले आहे,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com