Nana Patole -Chandrakant Handore
Nana Patole -Chandrakant HandoreSarkarnama

नाराजी व्यक्त करताच नाना पटोलेंनी घेतली चंद्रकांत हंडोरेंची भेट!

विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वकीय काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस (Congress) आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे पराभूत व्हावे लागलेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तसेच, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तातडीने हंडोरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. (After expressing displeasure, Nana Patole meet Chandrakant Handore)

विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वकीय काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. ज्यांनी क्रॉस व्होटिंग केले होते, त्यांची तक्रार हंडोरे पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याकडे केली होती. तसेच काँग्रेस पक्षाने समिती पाठवून अहवालही मागविला आहे. पण त्यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने हंडोरे हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द हंडोरे यांनी विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगबाबत नाराजी व्यक्ती केली होती. तसेच ते शिंदे गटात जाणार असल्याची वावडी उठली होती. त्याचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला होता.

Nana Patole -Chandrakant Handore
फडणवीस भेट आणि भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदेंनी स्पष्टच सांगितले...

नाराजी व्यक्त करताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने हंडोरे यांची भेट घेतली. त्यावेळी नानांनी हंडोरे यांची मनधरणी केल्याचे सांगितले जात आहे. पटोले यांच्या भेटीनंतर चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, माझ्या पराभवामुळे कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात नाराजीची भावना व्यक्त केली होती.

Nana Patole -Chandrakant Handore
पवारसाहेबांबद्दल नितांत आदर; भाजपप्रवेशाचे तुम्हाला कळेलच : फडणवीस भेटीवर राजन पाटील म्हणाले...

नाना पटोले म्हणाले की, चंद्रकांत हंडोरे यांना समजावून सांगण्याची माझीही क्षमता नाही. पण, हंडोरे यांचे धर्मनिरपेक्ष विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर जे प्रेम आहे, त्यामुळे ते चुकीचे मार्गाने जातील, असे मला स्वप्नातही वाटत नाही. हंडोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याची जी चर्चा घडवून आणली गेली ती म्हणजे हंडोरे यांना धर्मनिरपेक्ष आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारापासून दूर नेण्याचा प्रयत्न आहे. तो चिंताजनक आहे.

Nana Patole -Chandrakant Handore
राष्ट्रवादीला मोठा धक्का : बबनदादा शिंदे, राजन पाटलांनी घेतली दिल्लीत फडणवीसांची भेट

चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्ष सोडून जातील, असा विचार मी स्वप्नातही आणू शकत नाही. त्यामुळे मी त्यांच्या मनधरणीसाठी या ठिकाणी आलेलो नाही. भीमशक्ती संघटनेचे राज्यातून जे नेते आणि पदाधिकारी आले आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं आणि संपर्क असतो, त्यामुळे त्यांना भेटायला मी या ठिकाणी आलो आहे, असे पटोले यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com