Maharashtra Politics : निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय नंतर काय असणार भाजपचे पुढचे लक्ष? प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediTwitter @ANI

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं. यानंतर आता ठाकरे गटाकडे असलेले मशाल हे चिन्हसुद्धा त्यांच्याकडून काढून घेतली जाण्याची शक्यता ठाकरे गटातील नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे ठाकरे गटात सध्या बरीच अस्वस्थता दिसू लगाली आहे. भाजप आता कोणता डाव टाकणार याबाबत तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.

असे असताना कालपासूनच्या या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपचे पुढचे लक्ष्य काय असणार, यावर भाष्य केलं आहे. ट्विट करत चतुर्वेदी यांनी यावर भाष्य केलं आहे. "भाजपने निवडणूक आयोग, सक्तवसुली संचलनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांना त्यांचे निवडणूक टूलकिट बनवले आहे आणि आता त्यांचे पुढील लक्ष्य न्यायव्यवस्था असणार आहे. कायदामंत्री आणि राज्यसभेचे सभापती न्यायव्यवस्थेला आव्हान देत आहेत. त्यामुळे लोकशाहीचे रक्षण करणे ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे.'' असे चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

Priyanka Chaturvedi
Shivsena Symbol : तुमाणेंनी फोडला बाँब : ठाकरेंचे 2 खासदार, 10 आमदार फुटणार असल्याचा दावा!

तसेच, लोकशाही आणि कायद्याचे राज्य यांच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. पण त्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकीय पक्षांशी गद्दारी करणाऱ्यांची बाजू घेत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. निवडणूक आयोग ही 'पूर्ण तडजोड करणारी संस्था झाली आहे,'' असा आरोपही चतुर्वेदी यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्यात आले. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. अखेर शिंदेंना धनुष्यबाण चिन्हं देण्याचा निर्णय़ निवडणूक आयोगाने घेतला. या प्रकरणी सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होती. या दरम्यान आयोगाने हा निर्णय दिला. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. अनेकांचे याकडे लक्ष लागले होते.आज ७८ पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र दिले. मात्र या निकालानंतर राज्यभरातून शिवसैनिकांमधील असंतोष उफाळून येऊ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com