एकनाथ शिंदे नॉटरिचेबल: सुप्रिया सुळे,जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Eknath Shinde not reachable| आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास १७ हुन अधिक आमदार रात्रीपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. शिवसेनेकडून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असतानाच एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची निश्चित माहिती समोर आली आहे. (Eknath Shinde not reachable latest news update)

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊ उद्धव यांची भेटली. त्यानंतर आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचे निर्देश ‘मातोश्री’वरुन देण्यात आले आहेत.

नॉट रिचेबल मंत्र्यांमध्ये शिंदे यांच्यासह गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, संदीपान भूमरे, दादा भूसे आणि अब्दूल सत्तार या नेत्यांचा समावेश आहे. तर जवळपास वीस आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील ठाकरे सरकार जाणार की राहणार, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. या घडामोडींमुळे मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेशी संपर्क झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गायब झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे गुजरातला गेल्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. ते चर्चेसाठी तयार आहे. काही आमदारांशीही संपर्क झाला असून त्यांना परत येण्याची इच्छा आहे. पण तिथे घेराबंदी करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.


Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com