मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर गुलाबराव पाटलांनी राणेंना करुन दिली त्या दोन पराभवांची आठवण

Gulabrao Patil |Narayan Rane| 'उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे पाठीमागे नेलं आणि राज्यसभेच्या पराभवामुळे त्यांची नाच्चकी झाली, अशी टीका नारायण राणेंनी केली.
मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर गुलाबराव पाटलांनी  राणेंना करुन दिली त्या दोन पराभवांची आठवण
Gulabrao Patil Answered to Narayan Rane Sarkarnama

Gulabrao Patil Answered to Narayan Rane

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपने विजयी जल्लोष केला. पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपने (BJP) महाविकास आघाडीचा पराभव केला. यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. 'उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे पाठीमागे नेलं आणि राज्यसभेच्या पराभवामुळे त्यांची नाच्चकी झाली, अशी टीका नारायण राणेंनी केली.

आता नारायण राणेंच्या या टिकेला शिवसेना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिलंं आहे. "एका पराभवामुळे नाच्चकी झाली असेल तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले होते. मग त्याचं काय झालं, याचा त्यांनी विचार करावा," अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना सणसणीत उत्तर दिलंं आहे.

Gulabrao Patil Answered to Narayan Rane
राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस अन् सदाभाऊही माघार घेणार? आज फैसला

उद्धव ठाकरे यांनी राज्याला दहा वर्षे पाठीमागे नेलं, असा सवाल विचारला असता गुलाबराव पाटील म्हणाले की, "राज्यसभेची एक जागा पराभूत झाल्याने राज्याच्या विकासात काही फरक पडणार आहे का? राणेंच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाही, त्यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजावून सांगावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो," असा टोलाही त्यांनी पाटील यांनी लगावला.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले.
"सत्तेत असूनही महाविकास आघाडीची जेवढी मते मिळायला हवी होती तेवढीहा मते शिवसेना मिळाली नाही. त्यांचे आठ-नऊ आमदार फुटले. आता कुठे आहे त्यांची विश्वासार्हता? आम्ही विरोधात असतानाही एकसंध राहिलो. उलट आम्हीच त्यांची मते फोडली. राज्यात सत्तेत येण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता असते. या निकालामुळे तुम्ही अल्पमतात गेले आहात. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.

"निवडणुकीपर्यंत आमचेच आमदार निवडून येतील, अशा बढाया मारणाऱ्यांचे या निवडणुकीने पानिपत केले. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि सत्तेतून पायउतार व्हावे," अशी टीकाही नारायण राणे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in