असलम शेख यांच्यानंतर कॉंग्रेसचा मोठा नेता फडणवीसांच्या भेटीला

Congress| Milind Deora| मुंबई महापालिका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडल्या पाहिजेत
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

मुंबई : ''मुंबई महापालिका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडल्या पाहिजेत. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी वॉर्डरचनेत फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. मुंबई महापालिका निवडणूका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडाव्यात, यासाठी आम्ही आज (२ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईच्या नवीन वॉर्डच्या सीमा रद्द कराव्यात ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली, अशी माहिती काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी दिली.

यावेळी मिलींद देवरा यांच्यासोबत अमिन पटेल, रवी राजा आणि झिशान सिद्दीकी उपस्थित होते. देवरा यांनी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळासह मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ''आमची मागणी खुप सोपी आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांसाठी करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचना रद्द करण्यात याव्यात. पुर्वीप्रमाणे २२७ प्रभागांमध्येच निवडणुका व्हाव्यात. प्रभाग पुनर्रचना कुठल्याही एका पक्षाच्या फायद्याची ठरु नये, अशी मागणी देवरा यांनी फडणवीसांकडे केली आहे. तसेच, त्यासाठी आम्ही न्यायालयाच्या माध्यामातून आम्ही लढतच आहोत. पण आम्ही राजकीयदृष्ट्याही लढणार असल्याचं मिलींद देवरा यांनी म्हटलं आहे. मुंबईतील सामान्य जनतेच्या हक्कासाठी या निवडणूका निष्पक्षपातीपणे व्हाव्यात यासाठी मी हा लढा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Devendra Fadanvis
National Herald case : मोठी बातमी ! नॅशनल हेरॉल्डच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली होती. यात महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या २२७ वरुन२३६ एवढी वाढवण्यात आली होती. तसेच काही प्रभागांच्या सीमाही बदलण्यात आल्या होत्या. मात्र मुंबई महानगरपालिकेतील नवी प्रभाग रचना ही फक्त शिवसेनेच्या फायद्याची असल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या विरोधात कॉंग्रेस न्यायालयीन लढा लढणार असल्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी मिलींद देवरा यांनी देवेंद्र फडणवीसांना याबाबत पत्राद्वारेही मागणी केली होती. मिलिंद देवरा यांनी फडणवीसांना पत्र पाठवून प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण धोरणाला आपण त्वरीत रद्दबातल करावे आणि पारदर्शक पद्धतीने नवीन प्रभाग रचना करण्याकरिता एक स्वतंत्र समितीची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी मिलिंद देवरा यांच्या पत्राची तात्काळ दखल घेत, आपल्या भावनांची योग्य दखल घेतली जाईल. मुंबईकर आणि निष्पक्ष निवडणुकीबाबत जी अपेक्षा मांडली. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in