Raj Thackeray : अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे थेट फडणवीसांच्या बंगल्यावर : चर्चांना एकच उधाण!

Raj Thackeray : या भेटीला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे बोलले जात आहे.
Devendra Fadnavis | Raj Thackeray
Devendra Fadnavis | Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray : भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. गौतम अदानी हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरे आणि अदानी यांच्यामध्ये काही वेळ चर्चा ही झाली. ही भेट झाल्यानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यामुळे या लगोलग झालेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा घडत आहेत.

Devendra Fadnavis | Raj Thackeray
Congress : प्रदेश काँग्रेस कार्यकरिणीच्या बैठकीत का भडकले विजय वडेट्टीवार?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डिनर डिप्लोमसी होताना दिसून येत आहे. फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी राज ठाकरे पोहचले आहेत. या लगोलग झालेल्याभेटींचा राजकीय अर्थ काढले जातील. फडणवीस यांनी राज ठाकरेंना डिनरसाठी निमंत्रण दिले होते. मात्र या भेटीची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेत्यांशी जवळीक वाढली होती.

Devendra Fadnavis | Raj Thackeray
BJP : उर्फीसाठी वेळ पण, माझ्यावरील अन्याय पक्षात ऐकलं जात नाही : अंधारे-चाकणकरांसमोर महिलेने मांडली व्यथा!

राज ठाकरे यांची आगामी निवडणुकांसाठी भूमिका 'एकला चलो रे' ची आहे. मात्र भाजपच्या प्रमुख नेत्यांशी त्यांच्या होणाऱ्या भेटी, यामुळे आता पडद्यामागे राडकीयघडामोडींना वेग आले आहे. पडद्यामागे काही शिजतंय का? नवीन काही राजकीय समीकरणं घडून येतायेत का? या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. या भेटीला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे बोलले जात आहे. याबाबत आता चर्चांना, तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com