अन् विनोद तावडे अडीच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात परतले...

Vinod Tawde | BJP | : देशाच्या राजकारणात वावरणारे तावडे राज्याच्या राजकारणात मात्र दिसत नव्हते.
अन् विनोद तावडे अडीच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात परतले...
Vinod Tawde latest NewsSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राची २०१९ ची विधानसभा निवडणूक. भाजपकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत होत्या. पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी, अंतिम यादी... सगळ्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर झाली. पण या उमेदवारांमध्ये तेव्हाचे भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये मंत्री असलेल्या विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे यांची नावे कुठेही नव्हती. भाजपच्या या पहिल्या फळीतील नेत्यांची तिकीट कापल्याने अंतर्गत राजकारण उघड झालं. आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. (Vinod Tawde latest News)

आता या गोष्टीला अडीच वर्षांहुन अधिक काळ सरला.

या काळात चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषदेवर गेले. भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनाही विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने तेही पुन्हा आमदार होण्याच्या वाटेवर आहेत. हे दोन्ही नेते राज्याच्या राजकारणात पुन्हा आपला प्रभाव पाडण्यासाठी सज्ज झाले. प्रश्न होता विनोद तावडे यांचा. (Vinod Tawde latest News)

Vinod Tawde latest News
खडसेंच्या पराभवासाठी भाजपला हवीत फक्त तीन मते : महाजन लागलेत कामाला...

या सरलेल्या अडीच वर्षांपैकी एक वर्षे तावडे विजनवासात राहिले. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने तावडे यांना केंद्रीय राजकारणात सक्रिय केले. त्यांना आधी राष्ट्रीय सचिव आणि नंतर राष्ट्रीय सरचिटणीस पदावर बढती दिली. शिवाय, हरियाणाचे प्रभारी, चंदीगढ महापालिकेची जबाबदारी देण्यात आली. पण देशाच्या राजकारणात वावरणारे तावडे राज्याच्या राजकारणात मात्र दिसत नव्हते.

Vinod Tawde latest News
राजू शेट्टींचा पाया उखडलाय? : लोकसभेची पुढील लढत खासदार माने विरुद्ध आवाडे...

पण आता विनोद तावडे देखील पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले आहेत. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासून तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये एक बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून आणण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला विनोद तावडे उपस्थित होते. या निमित्ताने महाराष्ट्रातील नेत्यांसोबत पक्षाच्या बैठकीला अधिकृतरित्या उपस्थित राहण्याचा प्रसंग तावडे यांना बऱ्याच कालावधीनंतर अनुभवास आला. (Vinod Tawde latest News)

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघात मोदी सरकारच्या योजना पोहोचविणे, केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन करणे आदी बाबी यात ठरविण्यात आल्या. या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली. या साऱ्यात केंद्रीय निरीक्षक म्हणून तावडे उपस्थित राहिले.

तावडे महाराष्ट्रात सक्रिय होत असतानाच दुसरीकडे पक्षाने त्यांच्यासाठी पुन्हा नवीन अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पक्षाच्या व्यवस्थापन टिममध्ये तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. यात तावडे यांच्यासह आणि महाराष्ट्रातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचेही नाव आहे. सध्या राजकीय पदापेक्षाही संघटनेत तावडेंना विविध जबाबदाऱ्या मिळत असल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले आहे, हे निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in