Adv. Gunaratn Sadavarte : ॲड. सदावर्तेंनी स्थापन केलेला एसटी कष्टकरी जनसंघ फुटीच्या मार्गावर

या जनसंघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, समाज माध्यमांवर ते राजीनामे व्हायरलही झाले आहेत.
Adv. Gunaratna Sadavarte
Adv. Gunaratna Sadavarte Sarkarnama

मुंबई : एसटी (ST) कर्मचारी आंदोलकांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना धक्का बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर सदावर्ते यांनी स्थापन केलेल्या एसटी कष्टकरी जनसंघ फुटीच्या मार्गावर आहे. या जनसंघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, समाज माध्यमांवर ते राजीनामे व्हायरलही झाले आहेत. दरम्यान, जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त ॲड. सदावर्ते यांनी फेटाळून लावले आहे. (Adv Gunaratn Sadavarte founded ST kashtkari Jan Sangh on the way of breakup)

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी दिवाळीत शासकीय सेवेत सामाविष्ठ करण्यासाठी आंदोलन केले होते. जवळपासू तीन ते चार महिने ते आंदोलन चालले होते. त्यावेळी आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडण्याची जबाबदारी ॲड. सदावर्ते यांच्यावर होती. माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर सदावर्ते यांनीच आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

Adv. Gunaratna Sadavarte
Gram Panchayat Election : इच्छुकांनी मानले अजितदादांचे आभार ; निवडणूक आयोगाकडून मोठा बदल

दरम्यान, ॲड. गुणरत्न सदार्वे यांनी एसटी कर्मचारी संपानंतर एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केली होती. संपूर्ण राज्यात या जनसंघाचे सुमारे ८६ हजार सभासद असल्याचा दावा सदावर्ते यांच्याकडून करण्यात येत होता. या जनसंघाचे अध्यक्षपद सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले होते. या दोघांचाही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सक्रीय सहभाग हेाता.

Adv. Gunaratna Sadavarte
सुमित्रा महाजन यांनी राजकारणावर बोलणे टाळले!

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपला. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा जनसंघ काढला. मात्र, त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या मागणी आजही कायम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संयम आता सुटत चाललेला आहे. एसटी कर्मचारी आता सदावर्ते यांना फोन करून आपल्या संतप्त भावना ऐकवित आहेत. सदावर्ते यांच्यासोबत झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लीपही व्हायरल होत आहेत. त्यामुळे सदावर्ते यांनी स्थापन केलेला एसटी कष्टकरी जनसंघ आता फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

Adv. Gunaratna Sadavarte
Sambhaji Brigade : शिवसेना ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडमध्ये मंचावरच झाले मतभेद!

जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत ॲड गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, एसटी कष्टकरी जनसंघाच्या एकाही पदाधिकाऱ्याने राजीनामा दिलेला नाही. हा जनसंघाची बदनामी करण्याचा डाव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com