Shivsena: शिंदे गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? कायदेतज्ज्ञांचा दावा...
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून सरकार स्थापन केले असले तरी त्यांच्यासमोर अडचणी संपलेल्या नाहीत. चाळीस आमदारांना सोबत घेऊन शिवसेना (Shiv Sena) फोडली असली तरी त्यांना मोठ्या कायदेशीर लढ्याला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातून घटनात्मक पेचही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी शिंदे गटाकडून पुढील काही दिवसांत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी शक्यता व्यक्त केली आहे. (Eknath Shinde Latest News)
सरोदे यांनी ट्विट करत याबाबत शिंदे गटासमोर एकच पर्याय असल्याचा दावा केला आहे. कोणताही संवैधानिक संघर्ष न वाढवता एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. किंवा एक दुसरी शक्यता अशीही आहे की ते एखाद्या दुसऱ्या पक्षात विलीन होतील, असं सरोदे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.(Maharashtra Political Crisis News updates)
भाजप मध्ये विलीन होण्याचे मोठे गणित त्यांच्यासमोर मांडण्यात आलेले आहे असे कळते, असा दावाही सरोदे यांनी केला आहे. 11 तारखेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे जाण्याची चिन्हे आहेत कारण नवीन न्यायपीठाकडे प्रकरण वर्ग होणार असल्याने ते लगेच सुनावणी घेतील व 11 तारखेला लगेच महाराष्ट्राच्या विधानसभेतील घडलेल्या विविध संविधानिक गुंतागुंतीवर निकाल देण्यात येईल असे नाही, असंही सरोदे यांनी म्हटलं आहे.
काहीही असले तरी दुसऱ्या पक्षात सहभागी होऊन अपात्रता टाळायची व न्यायालयावर हा प्रश्न टाकून त्यांना संकटात टाकायचे नाही असा निर्णय होतोय, अशी शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना व शिंदे गटाकडून परस्परविरोधी याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. विधासनभेच्या उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या नोटिशीविरोधात शिंदे गटाने याचिका केली आहे. तर शिवसेनेकडूनही त्यांच्यावर कारवाईबाबत याचिका केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.