Rahul Kanal left Shiv Sena's WhatsApp group: आदित्य ठाकरेंचा विश्वासू शिलेदार नाराज...; कारण काय?

Aditya Thackeray: राज्यातील सत्तांतरापासून ठाकरे गटाला जणू काही गळतीच लागली आहे
Rahul Kanal left Shiv Sena's WhatsApp group:
Rahul Kanal left Shiv Sena's WhatsApp group:Sarkarnama

Rahul Kanal upset : राज्यातील सत्तांतरापासून ठाकरे गटाला जणू काही गळतीच लागली आहे. आमदार खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे राहुल कनाल हेदेखील नाराज असल्याची चर्चा समोर आली आहे. यामुळे पुन्हा शिवसेनेच्या गोटात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Rahul Kanal has left Shiv Sena's WhatsApp group)

Rahul Kanal left Shiv Sena's WhatsApp group:
Baramati News : पळशीच्या माजी सरपंचांची बातच न्यारी : वयाच्या ४० व्या वर्षी परीक्षा देत बारावीत पटकावला प्रथम क्रमांक

राहुल कनाल (Rahul Kanal) हे ठाकरे गटाच्या कोअर कमिटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला आहे. त्यांनी अचानक ग्रुप का सोडला, यावरुन आता चर्चेला उधाण आलं आहे. अतंर्गत कुरघोडींना कंटाळून कनाल यांनी व्हाट्सअप ग्रुप सोडल्याचं सांगितलं जात आहे. (Maharashtra Politics)

कोण आहेत राहुल कनाल?

आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशी राहुल कनाल यांची ओळख आहे.महाविकास आघाडीची सत्ता असताना शिर्डी संस्थानच्या सदस्यपदी कनाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. अशातच वांद्रे पश्मिमधून विधानसभेची निवडणूक लढवण्यास ते इच्छूक होते. युवासेनेतील अंतर्गत मतभेदांमुळेच कनाल व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले, अशी चर्चा आहे. (Shivsena- Thackeray Grpup News)

Rahul Kanal left Shiv Sena's WhatsApp group:
Niti Aayog meeting: नीती आयोगाच्या बैठकीतच विरोधकांनी ताकद दाखवली; तब्बल आठ मुख्यमंत्र्यांची दांडी!

अंतर्गत कुरघोडींमुळे कनाल यांच्याप्रमाणेच युवासेनेतील आणखी काही जण नाराज असल्याचीही चर्चा आहे. कनाल यांच्या प्रमाणेचअमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही आपली जाहीर नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com