शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर; ज्यांचं रक्त भगवं...

Aditya Thackeray| पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला सुरुवात
Aditya Thackeray|
Aditya Thackeray|

मुंबई : 'ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत,' अशा शब्दांत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर काही नगरसेवक आणि काही पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले. त्यावर बाकीचे आमदारदेखील बंड करतील, शिवसेना आता संपली, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना आदित्य ठाकरेंनी विरोधाकांना सुनावले आहे.

आमदांरांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली असून शुक्रवारी (८जुलै) त्यांनी वरळीतील शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. यासोबतच ते शिवसेनेच्या शाखा आणि बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांनाही भेटी देत आहेत. शुक्रवारी वरळीतील शिवसेनेच्या शाखेला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला.

Aditya Thackeray|
Shivsena : आजारपणाचा फायदा घेत 'त्यांनी' घात केला; ठाकरेंची भावनिक साद

''आम्ही राज्यभरात दौरा करणार आहोत. लोकांचे प्रेम, आशीर्वाद आजही शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांना त्यांच्यासोबत जायचंय त्यांनी जावं. पण मूळचा शिवसैनिक आहे. ज्यांचे रक्त भगवे आहे; ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार,” असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. आपण आतापर्यंत समाजकारणाकडे लक्ष दिलं, लोकांची कामं केली, पण आपण राजकारणात कमी पडलो, ज्यांनी राजकारणात पुढे गेले त्यांना जे राजकारण करायचं होतं ते त्यांनी केलं, पण आजही मुळ शिवसैनिक शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत आहे, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचंय, त्यांनी खुशाल जावं, ज्यांना स्वत:च काही स्थापन करायचं त्यांनी करावं, पण मला फक्त इतकंच सांगायचंय की ज्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूकीला सामोरं जावं, जनता जो कल देईल तो आम्हाला मान्य असेल, असे आव्हान शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in