शिंदे गटाच्या मेहेरबानीवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

Aditya Thackeray| विधिमंडळ सचिवांनी पाठवलेल्या नोटीसीमधून आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं आहे
शिंदे गटाच्या मेहेरबानीवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

मुंबई : विधिमंडळ सचिवांनी शिंदे गटासह शिवसेनेच्या 53 आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणीवेळी दोन्ही बाजूने बजावण्यात आलेले व्हीप डावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवांनी पाठवलेल्या नोटीसीमधून आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं आहे. तसेच सर्व आमदारांना सात दिवसांत विधिमंडळात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यावर कसल्याही खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचं कारण नव्हतं”. शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस राज्य सरकारने आरेमध्येच मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही ‘आरे वाचवा’ आंदोलन करत आहोत. हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

शिंदे गटाच्या मेहेरबानीवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुण्यात शिवसेनेला खिंडार ; साळी, भोसले देणार राजीनामा

“महाविकास आघाडीने कायम मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला. आम्ही ८०८ एकर जंगलासाठी घोषित केले. हे करताना तेथील आदिवासींचे हक्कही अबाधित ठेवले. मेट्रो कारशेडसाठी आपण कांजूर मार्गला करण्याचा निर्णय घेतला आहे. कारशेडचा वापर चार-पाच महिन्यातून एकदा होतो. आधीचं प्लानिंगही चुकीचं होतं. कांजूरमार्गची जागा मेट्रो ६ ला देण्याची मागणी आम्ही केंद्रसरकारकडे केली होती. आरे जंगल नसुन, इथे फक्त झाडांचा प्रश्न नाही, तर इथे अनेक प्राणी-पक्षांचे वास्तव्य आहे. पण सत्तेत येताच राज्यसरकारने महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात घेतला. आमच्यावरचा राग आमच्यावर काढा, पण मुंबईकरांवर काढू नका, एवढचं मला सांगायचं आहे, ” असं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं.

“मुंबईने नेहमीच शिवसेनाला साथ दिली. पण राज्य सरकारने आरेवरील, मुंबईवरील आमचं प्रेम यावर राग ठेवूनच महािकास आघाडीचा हा निर्णय घेतला,” अशी टीकाही त्यांनी केली. त्यामुळे आता या सरकारची ओळख स्थगिती सरकार अशी झाली आहे. सरकारची आमच्या सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in