आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मढ येथील बांधकामाचे महापालिकेकडून चौकशीचे आदेश

Kirit Somaiya| Aditya Thackeray| किरीट सोमय्या यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Aditya Thackeray|
Aditya Thackeray|

मुंबई : मढ मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी आता आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे.

महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती याप्रकरणाची चौकशी करणार असून 4 आठवड्यांत याचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर मढ मार्वे येथे तयार केलेल्या 49 फिल्म स्टुडिओंच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करुन हे स्टुडिओ बांधण्याचा आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

Aditya Thackeray|
Elelction | लागा तयारीला! 281 बाजार समित्यांचा निवडणूकांचे बिगुल वाजले

या प्रकरणी किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी पाहणी केली. स्टुडिओ बांधताना पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन करण्यात आल्याचे कारण देत स्टुडिओ पाडण्याची मागणी केली. स्टुडिओचं 28 व्यावसायिक आणि 10 लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना या बांधकांमासाठी अधिकृत परवानगी दिली होती. तुम्ही आरे वाचवण्यासाठी तुम्ही एवढं केलं, इथे तुम्हाला पर्यावरणाचंं नुकसान दिसलं नाही का? कोव्हिड काळात बांधकाम केलं हे तुम्हाला दिसलं नाही का? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

या बेकायदेशीर स्टुडियो प्रकरणाची शिंदे-फडणवीस सरकारनं चौकशी सुरु केली आहे. तिकडे अनिल परबचा आणि इकडे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाचे स्टुडिओ तुटणार, असल्याचा दावही सोमय्या यांनी केला आहे. 22 फेब्रुवारी 2021 रोजी आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने या स्टुडिओच्या बांधकामाला परवानगी दिली. पण ही परवानगी 6 महिन्यासाठी होती आणि आज 19 महिने झाले आहेत. हे स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळं ते तुटणारच", असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com