'हीच ती वेळ... आदित्य ठाकरेंचे शिवसैनिकांना आव्हान

Aditya Thackeray news| देशभरात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे.
Aditya Thackeray news|
Aditya Thackeray news|

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीपासून शिवसेनेला दिवसेंदिवस गळती लागली आहे. अशात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शिवसेनेला (Shiv Sena) नव्याने उभारी देण्यासाठी, पक्षबांधणीसाठी तयारीला लागल्याचे दिसत आहे. एकीकडे शिंदे गटाचा पाठिंबा वाढत असताना दूसरीकडे आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना राज्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे पूरपरिस्थितीत अडकलेल्यांना मदत करण्याच आवाहन शिवसैनिकांकडे केलं आहे. आताच्या राजकीय परिस्थितीकडं लक्ष न देता, जिथं-जिथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागांत शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा, असं त्यांनी आवाहन केलंय. सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची 'हीच ती वेळ' आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Aditya Thackeray news|
Aimim : औरंगाबाद पाहिजे की संभाजीनगर ? मतदान घ्या ; इम्तियाज जलील यांची मागणी..

देशभरात मुसळधार पावसाने (Heavy Rain In Maharashtra)थैमान घातलं आहे. गावांचा संपर्क तुटला आहे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. दरडी कोसळ्याने, वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून आतापर्यंत 102 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशातील राजकारणात खळबळ उडाली. या बंडामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. पण सध्या महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा अनेक जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला. यादृष्टीने आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना संकटात अडकलेल्या लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in