Shital Mhatre Viral Video: शीतल म्हात्रे 'व्हायरल व्हिडिओ'प्रकरणी अदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे ताब्यात

Maharashtra News: राज्यातील राजकीय वातावरण तापलं
Aditya Thackeray, Sainath Durge, Shital Mhatre
Aditya Thackeray, Sainath Durge, Shital MhatreSarkarnama

Aditya Thackeray: शिवसेनेच्या प्रतक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आता अदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता मोठे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शीतल म्हात्रे (Shital Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रॅलीत सामील झाले होते.या रॅलीतील व्हिडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता.'मातोश्री'नावाच्या फेसबुक पेजवरुन (Matoshree Page) हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

या व्हिडिओवरुन राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर आता अदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले साईनाथ दुर्गे यांना विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

Aditya Thackeray, Sainath Durge, Shital Mhatre
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या विधानपरीषदेच्या गटनेतेपदी मुख्यमंत्री शिंदेंचे नाव; जयंत पाटील म्हणतात माझेही पद धोक्यात...

दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने अब्रुनुकसानीचा दावा करत दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप राज यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिकारांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aditya Thackeray, Sainath Durge, Shital Mhatre
Maharashtra Budget Session: शीतल म्हात्रेंच्या त्या Video वरुन सभागृहात खडाजंगी; महिला आमदार भडकल्या...

या व्हिडिओवरुन शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. तर दुसरीकडे या व्हिडिओवरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ भाजपच्याच लोकांनी व्हायरल केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.सगळ्या विरोधातील महिला शितल म्हात्रे यांच्या सोबत आहोत. आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करुन कारवाई करावी.तसेच सोशल मीडियावर जेजे अंधभक्त व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर ही त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com