Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंनी मागितली भेटीची वेळ; राज ठाकरेंकडून अद्याप प्रतिसाद नाही, नितेश राणेंचा दावा

Aditya Thackeray and Raj Thackeray: एका खासगी कार्यक्रमात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याचाही दावा

Aditya Thackeray and Raj Thackeray
Aditya Thackeray and Raj ThackeraySarkarnama

Mumbai : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

अशातच शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.


Aditya Thackeray and Raj Thackeray
Fadnavis - Raj Thackeray Meet: राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीत कोणती चर्चा झाली; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

चार दिवसांपूर्वी एका खासगी कार्यक्रमात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्या भेटीसाठीची वेळ मागितली असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून अद्याप आदित्य ठाकरेंना कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.


Aditya Thackeray and Raj Thackeray
Devendra Fadnavis News : 'एक ना धड भाराभर चिंध्या'; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२९) रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीत तब्बल सव्वा तास खलबतं झाल्याची चर्चा आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितल्याच्या नितेश राणे यांच्या दाव्यामुळे येत्या काळात राज्यात राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com