
मुंबई : अयोध्या (Ayodhya) शिवसेनेसाठी नवीन नाही, ही आमची पायवाट आहे. गेली ३० वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचे एक नात निर्माण झालेले आहे. शरयूच्या तीरावर एखादा कार्यक्रम करण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी शिवसैनिक रवाना झाले असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे पाच जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्या आधी आदित्य यांचा अयोध्या दौरा होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या आगामी अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर राऊत यांनी पत्रकारांना माहिती दिली.
राऊत म्हणाले, ‘‘अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या दोन चार दिवसात निश्चित केली जाईल. कोरोनाच्या संपूर्ण कालखंडात काही निर्बंधांमुळे आम्हाला जाता आले नाही. नाहीतर आमचा हा जाण्याचा कार्यक्रम हा तेव्हापासूनच ठरलेला आहे. आता या संदर्भात आमच्या बैठका सुरू आहेत. प्रत्येक शिवसैनिक किंवा शिवसेनेचा पदाधिकारी, हा सतत अयोध्येत जात-येत आहे. मी स्वत: जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि मुख्यमंत्री झाल्यावरही जाऊन आले. आदित्य ठाकरे हे देखील अनेकदा जाऊन दर्शन घेऊन आलेले आहेत.
कोणाच्या बोलण्यावर दौरे ठरत नाहीत
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा हा ‘पिकनिक दौरा’ असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली आहे, यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “कोण काय बोलतय आणि कोणाला काय बोलायचं यावर आमचे दौरे ठरत नाही. अयोध्याच्या आंदोलनात शिवसैनिक होते. अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांचे बलिदान झाले आहे. जर अशा प्रकारचे जर कोणी वक्तव्य करत असेल, तर तो त्या आंदोलनाचा अपमान आहे आणि त्या बलिदानाचा अपमान आहे.”
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.