महाराष्ट्राबाहेर भगवा फडकला अन् आदित्य ठाकरे म्हणाले...

शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ मत मिळाली.
 Aditya Thackeray
Aditya Thackeray sarkarnama

मुंबई : शिवसेनाला महाराष्ट्राबाहेर आपला पहिला खासदार मिळाला आहे. दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामधील पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर तब्बल ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. अगदी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ मत मिळाली. तर भाजपचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार १५७ मत मिळाली आहेत. डेलकर यांच्या विजया नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत भाजपवर टीका केली आहे.

 Aditya Thackeray
बाळासाहेबांना जे जमले नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवले...

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ''दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही कलाबेन डेलकर यांचे अभिनंदन केले आहे. त्या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले ''दादरा-नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांचंही मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे भाजपच्या दडपशाहीच्या राजकारणाला मिळालेले सणसणीत उत्तर तर आहेच पण देशातील परिवर्तनाची नांदीही आहे.

 Aditya Thackeray
'शरद पवार, अजित दादा अन्न चोरणाऱ्या कार्यकर्त्याना थारा देणार नाहीत'

संजय राऊतांनी मानले मतदारांचे आभार

शिवसेनेच्या या विजयाच्या पार्श्वभुमीवर पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे हे महाराष्ट्राबाहेर दमदार पाऊल आहे. आम्ही अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करत होतो. ती संधी आम्हाला दादरा नगर हवेलीमध्ये प्राप्त झाली. त्याबद्दल त्यांनी तिथल्या मतदारांचे आभारही मानले आहेत. तसेच आजूबाजूच्या दमन, दक्षिण गुजरातमध्ये मतदारसंघांमध्येही काम सुरु करत असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com