निकालावर आदित्य ठाकरे म्हणाले, 'सत्यमेव जयते!'

Dasara Melava : "दसरा मेळाव्यासाठी वाजत-गाजत, गुलाल उधळत या,"
Aditya Thakre
Aditya ThakreSarkarnama

मुंबई : शिवतीर्थावर शिवसेेनेचा दसरा मेळावा घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शिवसेनेच्या याचिकेवर आज (ता.२३ सप्टेंबर) न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळून लावत 'शिवतीर्था'वर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेल परवानगी दिली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर आता शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदित्य यांनी ट्विट करत न्यायालयाचे आभार मानले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "सत्यमेव जयते. आपला दसरा हा शिवतीर्थावरच. विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय. सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार!"

Aditya Thakre
केसरकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार तर गायकवाड म्हणतात,ही तर आमचीच इच्छा

दरम्यान, आजच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आनंद व्यक्त केला होता. "आज न्याय मिळाला. हा लोकशाहीचा विजय आहे. आपल्या परंपरेला गालबोट लागले नाही. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी वाजत गाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत पण शिस्तीत या," असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले.

"राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, शिंदे गटाला आता सुप्रिम कोर्टात जायचं असेल तर ती त्यांची मर्जी, " असा टोला ही ठाकरेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com