आदित्य ठाकरे मैदानात; शिवसैनिकांना भेटण्यासाठी "निष्ठा यात्रा"

या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शिंदे गटाला शह देण्याची शक्यता आहे
Aditya Thackeray Latest News
Aditya Thackeray Latest News Sarkarnama

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) झालेल्या अभुतपूर्व बंडानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य दौरा करणार आहेत. याचवेळी मुंबईतल्या शाखा शाखांमध्ये शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत घेणार आहेत. यासाठी "निष्ठा यात्रा" काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. ७) पासुनच या यात्रेला सुरुवात होणार आहे. (Aditya Thackeray Latest News)

"निष्ठा यात्रेत" आदित्य मुंबईतल्या २३६ शाखांमध्ये जाऊन गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कडवट शिवसैनिकांनी शिवसेनेबद्दल दाखवलेली आत्मीयते बद्दल संवाद साधण्यासाठी "निष्ठा यात्रा" सुरु होणार आहे.

Aditya Thackeray Latest News
अमित शहा अडचणीत? भाजपच्या बड्या नेत्यानंच केली राजीनाम्याची मागणी

याचवेळी शिवसेनेच्या राज्यातील ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरे "निष्ठा यात्रे" दरम्यान दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटी, मेळावे ते घेणार आहेत. या मतदार संघांमधील शिवसेनेशी एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.

Aditya Thackeray Latest News
गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ATS कडे द्या; कुटुंबीयांकडून उच्च न्यायालयात अर्ज

शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी आपल्या मतदार संघात शक्ती प्रदर्शन करत खरी शिवसेना आपलीच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. या माध्यमातून आता शिंदे गटाला शह देण्यासाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com