एकनाथ शिंदे गटातील निवडक बंडखोरांसाठी आदित्य ठाकरेंचा मोठा मेसेज

Eknath Shinde | Aditya Thackerya | : बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे यांची बंडखोरांच्या मतदारसंघात जावून निष्ठा यात्रा
Aditya Thackeray Latest News
Aditya Thackeray Latest News Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना नेते आणि इतर आमदरारांसह कंबर कसली आहे. बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात जावून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. याचवेळी बोरीवलीच्या एका कार्यक्रमात ठाकरे यांनी शिंदे गटासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली.

मात्र शिवसेनेच्या (shivsena) ज्या आमदारांना पळवून नेले, ज्यांना फसवून नेण्यात आले आणि ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम खुले असल्याचा एक खास मेसेज आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिला आहे. शिवसैनिकांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, मी दिसलो पाहिजे. नाहीतर तुम्हाला वाटेल मी गुवाहाटीला गेलो. पण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, प्रेम आणि हवे ते सगळे दिले. त्यांनी आपला विश्वासघात केला. आपल्या पाठीत खंजीर खुपसला. सत्तेतून पळून जाणं हे पहिल्यांदाच दिसले.आता या आमदारांनी स्वतः ला विकले, की कोणती फाईल होती माहित नाही.

मुळात फुटीरतावादी आणि गद्दारांवर मला बोलायचंच नाही. तिथे गेलात, आता तिथे सुखी राहा, अशी टिप्पणी करत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. बंडखोर आमदारांना आव्हान देताना आदित्य ठाकरे म्हणाले, थोडी तरी लाज ठेवा आणि राजीनामे देवून निवडणुकीला सामोरे जा. शिवसेनेचा इतिहास आहे, ज्यांनी ज्यांनी बंड केले ते कधीही टिकले नाहीत. फुटीरतावादी, गद्दार कसे असतात, हे आता कळेल, गुवाहाटी, झाडी, गोवा आणि मग सकाळी सहा वाजता सगळे ओके. स्वतःची राक्षसी महत्वकांक्षा बघून ही गद्दारी केली. अशीही संतप्त टीका ठाकरे यांनी केली.

तो डान्स बघून मला किळस वाटली :

एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यानंतर बंडखोर आमदारांचा गोव्याच्या हॉटेलमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, बंडखोर आमदारांचा डान्सचा व्हिडीओ बघून मला किळस आली. उद्धव ठाकरे जेव्हा सर्जरीमध्ये होते तेव्हा तुम्ही सोडून गेलात. तेव्हा तुम्ही आमदारांची जमवा जमव केली. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसते. ते त्यांनी दाखवून दिले. आसाममध्ये पूर आलेला असताना हे मज्जा करत होते, असाही घणाघात ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com