Aditya Thackeray : चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर : आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल!

Aditya Thackeray : गद्दार सेनेला महाराष्ट्र यांना माफ करणार नाही.
Aditya Thakre
Aditya ThakreSarkarnama

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मदत केली जात नाही आणि दुसरीकडे राज्यातील मोठे मोठे उद्योग राज्यातून निघून जात आहेत. या घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास राहिलेला नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीकी केली.

आम्ही अनेक दिवसांपासून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. मात्र या घटनाबाह्य सरकारने कोणाचंच ऐकलं नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी आमची आजही मागणी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर सरकारकडून कोणी गेले नाही. एकीकडे शेतकऱ्यांना मदत केली जात नाही आणि दुसरीकडे राज्यातील मोठे मोठे उद्योग राज्यातून निघून जात आहेत. वेदांता, टाटा एअरबस, मेडीकल प्रकल्पानंतर चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. घटना बाह्य सरकारनेमुळे राज्याचं गुंतवणूक गेलं. महाराष्ट्रातल्या तरूणांचा रोजगार हिरावला गेला, असेही आदित्य म्हणाले.

Aditya Thakre
Eknath Shinde : मी सर्वांना कामाला लावलं ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्राला टोला

डबल इंजिन सरकार असं हे बोलत होते, पण डबल इंजिन मधलं एक इंजिन फेल गेलं आहे. देशातील उद्योजकांना या घटनाबाह्य सरकारवर विश्वास विश्वास राहिलेला नाही. घाणेरडं राजकारण केलं जात आहे. राज्याचे कृषीमंत्री कोण आहेत हेच कोणाला माहित नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अजूनही मदत पोहचलीच नाही, असेही आदित्य म्हणाले.

Aditya Thakre
मिंधे आणि कमळाबाईच्या अभद्र हातमिळवणीने महाराष्ट्राला ‘लुच्चे दिन’ ; ठाकरेंनी तोफ डागली

मागील काळात उद्योगमंत्री बोलले होते की टाटा एअरबस उद्याग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, आता हा उद्योग राज्यातून गेल्यावर उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवालही आदित्य यांनी विचारला. हे गद्दार सरकार महाराष्ट्राला मागे मागे नेत आहे, महाराष्ट्र यांना माफ करणार नाही. शिंदेची कोणतीही सेना नसून ती गद्दार सेना आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com