Aditya Thackeray : सरकारकडून राज्यातील तरूणांचे खच्चीकरण; मुंबईतील प्रकल्पाचा इंटरव्ह्यूव चेन्नईत का...

वेदांता प्रकल्पातून Vedanta Project एक लाख तर बल्क ड्रग्ज Bulk Drugs प्रकल्पातून ७० हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण, राज्य सरकारच्या State Government दूर्लक्षामुळे ते इतर राज्यात गेले आहेत.
Eknath Shinde, Aditya Thackeray
Eknath Shinde, Aditya Thackeraysarkarnama

मुंबई : विविध रोजगार निर्मिती करणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात घालवून हे खोके सरकार करतंय काय, असा प्रश्न उपस्थित करून वार्सोवा बांद्रा सी लिंकच्या कामाची कंपनी व ठेकेदार सरकारने बदलला आहे. या कामांसाठी स्थानिक भूमिपूत्रांना स्थान मिळावे, यासाठी इंटरव्ह्यूव मुंबईत घेण्याऐवजी ते चेन्न्ईत घेतले आहेत. यातून राज्यातील तरूणांचे खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट शिवसेना व भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, वेदांता प्रकल्पानंतर बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प महत्वाचा होता. यासाठी आम्ही रायगडला जागा घेतली होती. तसेच या प्रकल्पासाठी आम्ही केंद्राकडे मागणी केली होती. पण तो महाराष्ट्रात आला नाही. आदित्य ठाकरे म्हणाले, यातून राज्यातील ७० हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निघून गेले आहेत. आता मुख्यमंत्री दिल्लीवारीवर असून ही वारी त्यांच्या स्वतःसाठी की महाराष्ट्रासाठी हे समजले नाही.

Eknath Shinde, Aditya Thackeray
Foxcon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील युवकांची माफी मागावी!

विविध प्रकल्प गुजरात, अरूणाचल प्रदेशसह इतर राज्यात गेले याचे आम्हाला दुःख नाही. सगळीकडे विकासाला संधी मिळाली पाहिजे. युवकांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, अशी आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एमटीएचएलची पहाणी केली. पण ती केवळ काम करतोय हे दाखवण्यासाठी होती का, असा प्रश्न करून आदित्य ठाकरे म्हणाले, या सरकारचे कामावर लक्ष नाही. या प्रकल्पाचे महाविकासआघाडी सरकार असताना ८० टक्के काम पूर्ण झाले होते. २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणार होते.

Eknath Shinde, Aditya Thackeray
ग्रामपंचायतीचा धुराळा : भाजप एक नंबर तर शिवसेनेची पीछेहाट, अनेक दिग्गजांना धक्का!

आता तिसरा महत्वाचा प्रकल्प वार्सोवा बांद्रा सी लिंक असून हे काम काही महिने बंद होते. आता नव्या सरकारने या कामाची कंपनी व ठेकेदारही बदलला आहे. या नवीन कंपनीने जॉब इंटरव्ह्यूव ठेवले असून त्यासाठी बीटेक, बीई सिव्हील इंजिनिअरींग डिग्री आवश्यक आहे. महाराष्ट्रातील अनेक इंजिनिअरींग कॉलेजमधून मुले बाहेर पडली आहेत. या स्थानिक भूमिपूत्रांना मिळाली पहिजे होती. पण हे इंटरव्ह्यूव कंपनीने रामन्ना प्लाझा चेन्नई येथे ठेवले आहेत.

Eknath Shinde, Aditya Thackeray
आधी लग्न करून बघा, संसार काय असतो ते कळेल ; कदमांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

एकीकडे मुख्यमंत्री शिंदे आम्ही बाळासाहेबांची विचारधारा सोडली नाही. स्थानिक भूमिपूत्रांना न्याय देणारे सरकार आहे, असे सांगत आहेत. मग या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात इंटरव्ह्यूव घेण्याऐवजी चेन्नईतच का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेदांता प्रकल्पातून एक लाख तर बल्क ड्रग्ज प्रकल्पातून ७० हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण, या सर्वांच्या दूर्लक्षामुळे त्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील तरूण तरूणांचे खच्चीकरण चालले आहे, मुख्यमंत्र्यांच्या संमत्तीने हे सर्व चालले आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in