लादेनसारखा याकूब मेमनचा मृतदेह समुद्रात का दफन केला नाही?

Aditya Thackeray : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
aditya thackeray
aditya thackeraysarkarnama

Aditya Thackeray : मुंबई : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मेमनच्या कबरीला संगमरवर लावून कबरीची मजार करण्यात आली आहे असा, आरोप भाजपकडून (BJP) केला जात आहे. भाजपने या प्रकरणी थेट माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप करत हेच का तुमचे मुंबईवरचे आणि देशावरचे प्रेम असा सवाल केला. आता या प्रकरणात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण केले जाणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. याकूब मेमनला फाशी देण्यात आली तेव्हा त्याचा मृतदेह कुटुंबाला का देण्यात आला? तेव्हा राज्यात कोणाचे सरकार होते? याकूब मेमनच्या मृतदेहावर मान-सन्मानात अंत्यसंस्कार का झाले? असे तिखट सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे भाजपवर निशाणा साधळा. ओसामा बिन लादेनच्या मृतदेहासारखा याकूबचा मृतदेह समुद्रात का दफन केला नाही? मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने हे आरोप होत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

aditya thackeray
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी गणेश दर्शन करीत नाही, अजितदादांचा टोला कुणाला?

मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत मेमनची कबर लाईट लावून सजवण्यात आली आहे. तसेच त्या कबरीला मार्बल लावण्यात आले असल्याचे दिसत आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तानमध्ये त्याचा अंत्यविधी झाला होता. फाशी देण्यात आल्यानंतर पोलिसांनी मेननचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या बडा कब्रस्तान भागात मेमनचे पार्थिव दफन करण्यात आले.

aditya thackeray
गणेश विसर्जन मिरवणुकीत डॅाल्बी वाजवताय मग ही बातमी वाचाच...

मेमनच्या कबरीवरून राजकारण असे रंगले आहे की भाजपने आता थेट या प्रकरणी आधीच्या सरकारवर आरोप केले आहेत. याकूबच्या कबरीला मजारचे स्वरूप आले. मुंबईचा गुन्हेगार असलेल्या याकूब मेमनच्या कबरीला मजारचे स्वरूप येणे ही बाब दुर्दैवी आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in