घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि....: आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर आसूड

Aditya Thackeray news| शिवसेनेतील फुटीनंतर आता आदित्य ठाकरेंही चांगलेच सक्रीय झाले आहेत.
Aditya Thackeray news|
Aditya Thackeray news|

मुंबई :'' बंडखोरी करणाऱ्यांच्या भ्रष्टाचार, घोटाळ्याच्या फाईल्स उघडल्या गेल्याने या नेत्यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला,'' अशा शब्दांत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर टीकास्त्र डागलं.

मंगळवारी (१९ जुलै) दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही मागणीला मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. तर दूसरीकडे स्थानिक पातळीवरही शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर अनेकानी राजीनामे देत शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला.

Aditya Thackeray news|
SC Hearing on Shiv Sena LIVE : ठाकरे सरकार पाडताना घटनेची पायमल्ली; 'सर्वोच्च' सुनावणी सुरू

तर शिवसेनेतील फुटीनंतर आता आदित्य ठाकरेंही चांगलेच सक्रीय झाले आहेत. आमदार खासदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे मुंबईमध्ये सध्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “तुमच्यावर दडपण होतं, तुमच्या काही फाईल्स उघडल्या गेल्या, पण घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि त्या लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा,” असं म्हणत आदित्य यांनी बंडखोरांना लक्ष्य केलं.

“शिवसेनेशी गद्दारी करायची नंतर आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, महाराष्ट्र धर्मासाठी गेलो, असं बोलायला मोकळे. पण हे सर्व थोतांड आहे. त्यांना स्वत:ला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी तुमच्याबरोबर, आमच्याबरोबर गद्दारी केली,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. तुम्ही दिल्लीसमोर जाऊन झुकलात. दिल्लीकडे आपण (महाराष्ट्राच्या मदतीसाठी) काही पॅकेज मागत नाही, गुवाहाटीला, सुरतेला जाऊन मजा करता याला तुम्ही बंडखोरी तरी कशी म्हणता?” असा सवालही आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com