आदित्य ठाकरेंचे भाषण एकनाथ शिंदे तानाजी सावंतांच्या घरात बसून ऐकणार!

शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळी पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत.
Aditya Thackeray, Eknath Shinde
Aditya Thackeray, Eknath Shindesarkarnama

पुणे : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सध्या 'शिव संवाद' यात्रा सुरु आहे. ते मंगळवारी पुण्यातील कात्रज चौकात सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेही याच सुमारास शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कात्रज येथील निवासस्थानी येणार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळी पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते एकाच वेळी एकाच ठिकाणी येणार असल्याने आदित्य ठाकरे यांचा आवाज सावंतांच्या घरी शिंदेंच्या कानावर पडू शकतो.

आदित्य ठाकरे हे 'शिव संवाद' यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. एकनाथ शिंदे यांचाही महाराष्ट्र दौरा सुरु आहे. ते मंगळवारी पुण्यात विविध विकासकामांचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. शिंदे सकाळी पुणे दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात पत्रकार परिषदेने होणार आहे. त्यानंतर ते विविध ठिकाणी भेटीगाठी घेऊन तानाजी सावंत यांच्या निवास्थानी येणार आहेत.

Aditya Thackeray, Eknath Shinde
Hingoli : गद्दाराची गाडी जो पहिले फोडेल, त्याला जिल्हाप्रमुखपद अन् मातोश्रीवर सन्मान..

शिंदे साधारण त्यांच्या दौऱ्याच्या वेळा पत्रकानुसार ७ वाजता कात्रत चौकाच्या जवळ असलेल्या सावंत यांच्या घरी जाणार आहेत. त्याच दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे आदित्य ठाकरेही कात्रज चौकात धडकणार आहेत. आदित्य यांच्या दौऱ्यानुसार सायंकाळी ०६:४५ ला ते कात्रज येथे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेतील अभुतपूर्व बंडानंतर ठाकरे आणि शिंदे प्रथमच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते एकाच वेळी एकाच ठिकाणी येणार असल्याने आदित्य ठाकरे यांचा आवाज सावंतांच्या घरी शिंदेंच्या कानावर पडू शकतो. यामुळे आदित्य काय बोलणार याकडे शिंदे गटाचे लक्ष असणार आहे.

Aditya Thackeray, Eknath Shinde
ठाकरेंच कोणतं गुपित एकनाथ शिंदेंकडे आहे की ज्यामुळे भूकंप होईल?

या दौन्ही नेत्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे पुण्यातील अनेक पदाधिकारी आधीच शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. त्यात आदित्य यांच्या युवा सेनेतील पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्ये कोण कोणाला भारी ठरणार अशी चर्चा शहरात रंगली आहे. शिंदे शिवसेनेला आणखी धक्के देतात की आदित्य शिवसेनेची मोट कायम ठेवणार याकडे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com