Adipurush : महाराष्ट्रात प्रदर्शित होऊच देणार नाही, भाजपची आक्रमक भूमिका!

Adipurush : देवी-देवतांचा अपमान, हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
ADipurush
ADipurushSarkarnama

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला होता. यावर सोशल मीडियावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. चित्रपटातील पात्रांचे लूकवरून वादविवाद घडले आहे. यावर आता भाजप आमदार राम कदम यांनी सुद्धा जोरदार आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शितच होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.(Ram Kadam)

आमदार कदम यांनी काही एक ट्विट केले आहे, 'आदिपुरुष चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा एकदा फालतू लोकप्रियता मिळवण्यासाठी, आमच्या हिंदू देवी-देवतांचा अपमान केला आहे. देवी-देवतांचा अपमान करत, हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची'. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

ADipurush
अनिल देशमुख बाहेर येणार? ईडीची महत्वाची अपडेट आली समोर!

दरम्यान आणखी एका ट्विटमध्ये राम कदमांनी म्हटले की, "अभिनेता सैफ अली खानने त्याच्या पुढील चित्रपट ; आदिपुरुष' संदर्भात धक्कादायक विधान केले आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा सैफअली म्हणतो की, रावणाने सीता माईंचं अपहरण केलं ते चित्रपटात न्याय बाजूने असेल. यामध्ये रावणाची एक मानवीय बाजू दाखवण्यात येईल. प्रभू श्रीरामासोबतचं रावणाचं हे युद्ध चित्रपटात न्यायसंगत ठरेल." यावर कदमांनी आक्षेप नोंदवला आहे.

'आदिपुरुष' या बहुचर्चित बिगबजेट चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. नुकतंच 'आदिपुरुष' चा टीजर प्रदर्शित झाले होते. मात्र या चित्रपटातील व्हिएफेक्स इफेक्टची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे. तसेच चित्रपटातील पात्रांच्या लुक्सवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य स्टार प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे यांसारखी मोठी आणि तगडी स्टारकास्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com