अधीश बंगला प्रकरण : न्यायालयाच्या निर्णयाला राणेंची आव्हान देणारी याचिका?

Narayan Rane : अधीश बंगल्याचे बांधकाम बेकायदेशीर, उच्च न्यायालयाचे पाडण्याचे आदेश. राणेंना १० लाखाचा दंडही ठोठावण्यात आले होते.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगल्याचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून उच्च न्यायालयाने ते दोन आठवड्यांत पाडून टाकण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. बेकायदा ठरवलेले बांधकाम नियमित करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतल्याबद्दल राणे यांना १० लाख रुपये दंडही ठोठावणयात आले होते. आता पुन्हा राणे यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईस्थित जुहू येथील आठ मजली असलेल्या अधीश बंगल्यात अंतर्गत भागात फार फेरबदल केल्याची, नियमाबाहेर जाऊन बांधकाम केल्याची, तसेच सीआरझेडच्या निर्धारीत नियमांना डावलल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मुंबई मनपाकडे केली होती. या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांकडून अधीश बंगल्याची तपासणी झाली होती. यामध्ये अंतर्गत फेरबदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या तपासणीत नमूद झाले होते. यानंतर राणे यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली होती.

Narayan Rane
NIA Raid : PFIच्या कार्यालयांवर एनआयएचे छापे ; पुण्यातील दोनजणांसह राज्यात 20 जणांना अटक

हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असता, अधीश बंगल्यातील बांधकाम बेकायदेशीर ठरवून उच्च न्यायालयाने ते दोन आठवड्यांत पाडून टाकण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. यासोबत, बेकायदा ठरवलेले बांधकाम नियमित करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याबद्दल राणे यांना १० लाख रुपये दंडही ठोठावला होता. मुंबई महानगरपालिकेकडून अधीश बंगला पाडण्याची शक्यता आहे. यामुळे राणे पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देण्याची तयारीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in