नितेश राणे अनिल परबांना उद्देशून म्हणाले, ही तर सुरवात आहे...
Nitesh RaneSarkarnama

नितेश राणे अनिल परबांना उद्देशून म्हणाले, ही तर सुरवात आहे...

सिंधुदुर्ग ( Sindhudurga ) येथे पत्रकारांनी नितेश राणे ( Nitesh Rane ) यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनिल परब ( Anil Parab ) यांच्यावर टीका केली.

मुंबई : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवास स्थानावर जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकली. या संदर्भात सिंधुदुर्ग येथे पत्रकारांनी नितेश राणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली. Addressing Anil Parab, Nitesh Rane said, this is just the beginning ...

नितेश राणे म्हणाले, अनिल परबांसाठी ही फक्त सुरवात आहे. एसटी कामगार यापेक्षा टोकाची भूमिका घेणार आहेत, असे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे.

Nitesh Rane
शिवसेनेनंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे दगडी चाळीत

नितेश राणे पुढे म्हणाले की, अनिल परब एवढा निर्लज्ज माणूस आहे, की काल संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांबरोबर बैठक घेण्यासाठी येत होता. तेथे हाकेच्या अंतरावर आझाद मैदान आहे. अनिल देसाईही त्यांच्या बरोबर होते. त्यांच्यात एवढीही माणूसकी नाही, की समोर आझाद मैदानामध्ये येऊन आंदोलन करणाऱ्या लोकांना भेटावे.

मुंबई महापालिकेमध्ये आल्यावर आझाद मैदानावर लोकांना भेटले नाहीत. म्हणून मी तर म्हणतो की नुसती शाईच का ? याच्या पेक्षाही टोकाचे पाऊल घेतले तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्यांनी कामगारांची घरे उध्वस्त केली आहेत. त्यांच्या घरात तर कामगार घुसणारचं. त्यांनी हे सहन करावे, ही तर सुरवात आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.