राज कुंद्रा असा चालवत होता पॉर्नचा धंदा..वुई ट्रान्सफरने परदेशात पाठवल्या फिल्म - actress shilpa shetty husband raj kundra send films through we transfer | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

राज कुंद्रा असा चालवत होता पॉर्नचा धंदा..वुई ट्रान्सफरने परदेशात पाठवल्या फिल्म

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जुलै 2021

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्म बनवून वितरीत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हे मोठे रॅकेट असून, यामागील सूत्रधार राज कुंद्रा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुंद्रा हा वुई ट्रान्सफरच्या माध्यमातून विदेशात पॉर्न फिल्म पाठवत होता. या धंद्यात त्याने 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

कुंद्रा याने पॉर्न फिल्मसाठी अनेक अॅप्लिकेशन तयार केली होती. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पॉर्न व्हिडीओ दाखवले जात. यासाठी यूजरकूडन पैसे घेतले जात. कुंद्रा हा भारतात पॉर्न फिल्म तयार करुन वुई चॅटच्या माध्यमातून विदेशात पाठवत असे. तेथे ते वेगवेगळ्या अॅप्लिकेशनवर अपलोड केले जात. यासाठी त्याने 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कुंद्रा याच्या ब्रिटनमधील भावाने केनरिन नावाची एक कंपनी बनवली आहे. ही कंपनीही पॉर्न फिल्म दाखवत असे. 

कुंद्रा याने या व्यवसायासाठी पाच जणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप  बनवला होता. या ग्रुपची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या ग्रुुपवर त्याच्या पॉर्न फिल्मच्या व्यवसायाचे सर्व तपशील आहेत. त्याने किती पॉर्न फिल्म बनवल्या, त्यासाठी किती खर्च केल्या आणि त्यातून किती उत्पन्न मिळाले, याचीही माहिती पोलिसांनी मिळाली आहे. 

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या  गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.

 हेही वाचा : संतापून पंतप्रधान नरेंद्र मोदी तडक पडले सभागृहाबाहेर 

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना फेब्रुवारीमध्ये मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यावेळी या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

त्यावेळी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यास्मीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा असल्याचे समोर आले होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख