Richa Chadha : लष्करी जवानांची खिल्ली उडवणाऱ्या ऋचा चढ्ढाच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल

Richa Chadha : अशोक पंडित यांनी जुहू पोलीस ठाण्यात ऋचा चढ्ढा विरोधात तक्रार करण्यासाठी अर्ज दिला आहे.
Richa Chadha
Richa Chadha sarkarnama

Richa Chadha : अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने लष्कराबाबत केलेल्या विधानावरुन तिच्यावर जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

भारतीय जवानांनी काश्मीर मधील गलवान घाटी परिसरात बलिदान दिलं यावर ऋचा चड्डा हिने वादग्रस्त विधान केलं होते. यामुळे देशवासीयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यामुळे जवानांचा अपमान केल्याप्रकरणी चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी जुहू पोलीस ठाण्यात ऋचा चढ्ढा विरोधात तक्रार करण्यासाठी अर्ज दिला आहे.

Richa Chadha
Udayanraje Bhosale : पवार, गडकरींनी कोश्यारींवर तेव्हा आक्षेप का घेतला नाही ; उदयनराजेंचा सवाल

अभिनेत्री ऋचाने भारतीय जवानांचा अपमान केला आहे. खास करून गलवान घाटी मध्ये जय जवान शहीद झाले त्या जवानांच्या बलिदानाची तिने खिल्ली उडवली आहे. तिचं हे कृत्य जवानांचा अपमान करणारा असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे अशोक पंडित यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. या विषयावर ऋचाने यापूर्वीच माफी मागितली आहे.

ऋचा चड्ढावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऋचाने तिच्या ट्वीटमध्ये भारतीय सेनेच्या उत्तरी सेनेचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत चीनच्या सीमेचे गलवानमध्ये समोर आलेल्या एका जुन्या घटनाक्रमासोबत जोडले होते.या वादग्रस्त वक्तव्यानंतर ऋचा चड्ढाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यानंतर तिने तिच्या ट्वीट अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर माफी मागितली.

“माझा उद्देश सेनेचा अपमान करण्याचा नव्हता. माझ्या तीन शब्दांना वादात ओढण्यात आलं. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते. माझे आजोबा स्वतः भारतीय सेनेत होते आणि लेफ्टिनेंट कर्नल होते. भारत-चीन युद्धामध्ये त्यांना गोळी लागली होती. माझे मामा देखील सेनेत होते. हे माझ्या रक्तातच आहे. जर सेनेतील जवान शहीद होत असेल तर त्यामुळे त्याचे कुटुंबीय प्रभाविक होतात. हा माझ्यासाठी एक भावनिक मुद्दा आहे.” असे तिनं आपल्या टि्वट मध्ये म्हटलं होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com