प्राजक्ता माळी तोंडघशी! सोशल मीडियावर पुन्हा झाली ट्रोल

अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा अडकली वादात
Prajaktta Mali
Prajaktta Mali Sarkarnama

मुंबई : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेला प्राजक्तानं पाठिंबा दिला होता. याबाबत ट्विट करणं प्राजक्ताला चांगलंच महागात पडलं होतं. यावरून ट्रोल होताच लगेचच तिनं ट्विट डिलिट केलं होतं. आता ती फेसबुक पोस्टवरून अडचणीत आली आहे.

प्राजक्ता माळीनं आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. यात कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेतील दोन ओळी आहेत. त्याखाली तिनं शांता शेळके यांच्याऐवजी शांती शेळके असं लिहिलं आहे.

थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..
ऋतू हिरवा, ऋतू बरवा…

-शांती शेळके.

अशी पोस्ट प्राजक्तानं केली आहे. यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

Prajaktta Mali
सुटका होताच राणा दांपत्याची मोदी अन् शहांच्या भेटीला थेट दिल्लीकडे धाव!

अनेक जणांनी यावरून प्राजक्ताला ट्रोल केलं आहे. नाव माहित नसेल तर लिहिण्याआधी कुणाकडून तरी खात्री करून घ्यावी. चुकीचे नाव लिहून त्यांचा अवमान करू नका, असं एका यूजरनं म्हटलं आहे. भोंग्याचा गोंगाट हिच्या मस्तकात इतका भिनलाय कि सुप्रसिद्ध कवयित्रीचे नाव सुद्धा विसरली..या असल्या चुका चुकून होत नसतात. हे एक विकृत षडयंत्र, अशी टीका दुसऱ्या यूजरनं केली आहे. कवयित्रीच नाव शांताबाई शेळके असे आहे. जरा आदर दाखवावा, अशी आठवण आणखी एका यूजरनं करून दिली आहे.

Prajaktta Mali
चर्चांना उधाण! महाआरतीनंतर आता मनसेच्या वसंत मोरेंची ईदच्या मेजवानीला हजेरी

दरम्यान, याआधी प्राजक्ता माळीनं ट्विट करून वाद ओढवून घेतला होता. तिने मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. उद्यापासून गोंगाट बंद होईल, असं म्हणत तिनं सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, या ट्विटवरून ट्रोल होताच प्राजक्ताने आपले ट्विट लगेचच डिलिट केले होते. प्राजक्ता आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. असो....आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. # शांतताप्रिय धन्यवाद मा. श्री राज ठाकरे @raj_shrikant_thackeray

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in