बॉलीवूडला कोरोनाचा विळखा! नोरापाठोपाठ मृणाल 'पॉझिटिव्ह'

महाराष्ट्रातील कोरोना (Covid-19) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता बॉलीवूडला (Bollywood) कोरोनाचा विळखा पडला आहे.
Mrunal Thakur and Nora Fatehi 

Mrunal Thakur and Nora Fatehi 

Sarkarnama

मुंबई : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा धोका वाढला आहे. आता बॉलीवूडला (Bollywood) पुन्हा एकदा कोरोनाने विळखा घातल्याचे समोर येत आहे. काल (31 डिसेंबर) अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, अनिल कपूरची कन्या रिया कपूर व तिचा पती करण बुलानी अशा चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होता. आता बॉलीवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर याही कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच नोरा विलगीकरणात गेली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती उपचार घेत आहे. मृणाल ठाकूरलाही कोरोना संसर्ग झाला आहे. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. मृणालने म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. मी स्वत: विलगीकरणात गेले आहे. तुमच्यापैकी कुणी माझ्या संपर्कात आले असाल तर कृपया कोरोनाची चाचणी करा, सुरक्षित राहा.

<div class="paragraphs"><p>Mrunal Thakur and Nora Fatehi&nbsp;</p></div>
सावधान! महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णसंख्या तिसऱ्या आठवड्यात दोन लाखांवर जाणार

बॉलीवूडमध्येही कोरोना संसर्ग आता वाढू लागलेला दिसत आहे. काही दिवसांआधी अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, मेहर कपूर या चौघी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. यानंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. अर्जुनला आता दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तो पॉझिटिव्ह सापडला होता.

<div class="paragraphs"><p>Mrunal Thakur and Nora Fatehi&nbsp;</p></div>
ममतांचा दे धक्का! भाचे अभिषेक बॅनर्जी अन् प्रशांत किशोर यांचेच छाटले पंख

महाराष्ट्रातील (Mahrashtra) कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आता विवाह सोहळा, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसह अंत्यसंस्कारांवर काही निर्बंध घातले आहेत. विवाह सोहळा अथवा सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमासांसाठी किमान 50 नागरिकांनाच परवानगी असेल. अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्यातील पर्यटनस्थळे, किनारे, खुली मैदाने आदी गर्दीच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com