Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसोबत मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत 'ही' अभिनेत्री चालणार..

Bharat Jodo Yatra Actress Nagma : गेल्या 8 वर्षात भारतीय जनता पक्षाने देशात फूट पाडण्याचे काम केले आहे.
Bharat Jodo Yatra latest news
Bharat Jodo Yatra latest newssarkarnama

Bharat Jodo Yatra Actress Nagma : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. यावरून भाजप, मनसे आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली. अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघाले. शेगावातून 'भारत जोडो यात्रा'मार्गस्थ होत आहे. या यात्रेत स्वातंत्र्यसैनिक, खेळाडू यांच्या सहभागानंतर आता बॅालीवुडची पावलंही भारत जोडो यात्रेकडे वळत आहेत.

अभिनेत्री नगमा यांनी काल (शुक्रवारी) या यात्रेत सहभाग घेतला. "काल शुक्रवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. शेगावमधील विराट सभा बघून भारावली. आता मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत यात्रेसोबत चालणार," असे अभिनेत्री नगमा 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाल्या.

Bharat Jodo Yatra latest news
Sushma Andhare : आमचे भाऊ तर मुख्यमंत्री आहेत, त्यांचा नाद करायचा नाही..; अंधारेंचा टोमणा

"राहुल गांधी यांनी फार चांगला पुढाकार घेतला आहे. या यात्रेमुळे देशात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. गेल्या 8 वर्षात भारतीय जनता पक्षाने देशात फूट पाडण्याचे काम केले आहे. जनतेला दबावात ठेवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे लोक घाबरलेले आहेत. या यात्रेमुळे लोकांना विश्वास वाटतोय की, देशातील दहशतीचे वातावरण आता बदलेल," असे नगमा यांनी सांगितले.

"द्वेषभावना बाजुला ठेवून देशवासीयांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी, राहुल गांधी यांनी चांगला पुढाकार घेतला आहे. शेगावची सभा खूप चांगली झाली. या सभेतून तमाम जनतेला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात दररोज हजारोच्या संख्येने लोक भारत जोडो यात्रेत जुळत आहेत," असे नगमा म्हणाल्या.

आज पहाटे राहुल गांधी यांच्या सोबत पायी चालण्याचा अनुभव खूप चांगला राहिला. आज इंदिरा गांधी यांची जयंती असल्यामुळे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नगमा यांच्यासोबत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

त्या यात्रेची आठवण ..

1930 मध्ये महात्मा गांधी यांनी 378 किलोमीटर अंतराची यात्रा 24 दिवास केली होती आणि आता राहुल गांधी 150 दिवस 3500 किलोमीटर अंतराची यात्रा करीत आहेत. तेव्हा जी परिस्थिती होती, तशीच काहीशी स्थिती आजही आहे. त्यामुळेच या यात्रेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही अभिनेत्री नगमा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com