केतकी चितळेला पुन्हा झटका; अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक अन् पाच दिवसांची पोलीस कोठडी

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या आहेत.
Ketaki Chitale Latest Marathi News
Ketaki Chitale Latest Marathi NewsSarkarnama

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या आहेत. केतकीवर आता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक करून तिला शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. सध्या ती न्यायालयीनो कोठडीत होती. (Ketaki Chitale Latest Marathi News)

Ketaki Chitale Latest Marathi News
केतकी चितळे प्रकरणाला वेगळे वळण: त्या' मेसेजचीही चौकशी होणार

रबाळे पोलिसांनी केतकीला ठाणे कारागृहातून गुरूवारी ताब्यात घेतले. तिच्याविरोधात वर्ष 2020 मध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तिनं फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्टनंतर राज्यात तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल केला आहे. ठाणे न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, बुधवारी पुन्हा न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

केतकी विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर खालच्या भाषेत टीका करणे खपवून घेणार नाही, असा इशाराच राष्ट्रवादीने दिला आहे. तर राज्यात ठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने संबंधित पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा मागितला जाऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com