जॅकलिन पडली तोंडघशी! अखेर न्यायालयात घ्यावी लागली माघार

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कायम
Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandezsarkarnama

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आता चांगलीच अडचणीत आली आहे. तब्बल दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील सूत्रधारासोबतचे तिचे संबंध उघड झाले आहेत. यामुळे जॅकलिन ही सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) रडारवर आली आहे. तिच्या 7.27 कोटी रुपयांच्या मालमत्तांवरही ईडीने टाच आणली होती. या प्रकरणी तिने उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती, परंतु, तिला आता माघार घ्यावी लागली आहे.

परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी जॅकलिननं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अबूधाबीत होणाऱ्या आयफा सोहळ्यासाठी तिला जायचे असून, 15 दिवसांसाठी परदेशात जाण्याची परवानगी तिने न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, हा सोहळा पुढे ढकलण्यात आला असून, तो जूनमध्ये होणार आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. न्यायालयानं याबाबत जॅकलिनच्या वकिलांना विचारणा केली. आधीच कशासाठी परवानगी हवी, असेही न्यायालयानं विचारलं. यानंतर जॅकलिनच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला. काही दिवसांनी पुन्हा न्यायालयात अर्ज करू, असे त्यांनी सांगितलं.

तब्बल दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा आहे. त्याच्याशी जॅकलिनचे संबंध उघड झाल्यानंतर ईडीने तिची चौकशी केली होती. यानंतर ईडीने जॅकलिनच्या 7.27 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली होती. तिच्या विरोधात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लुकआऊट नोटीस बजावण्यात आल्याने तिला परदेशात जाण्यास मनाई आहे.

Jacqueline Fernandez
कोरोनाचा उद्रेक! उत्तर कोरियात 24 तासांत दोन लाख जणांना संसर्ग

सुकेश आणि जॅकलिनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो गेल्या वर्षीच्या एप्रिल-जून महिन्यातील होता. त्यावेळी सुकेश हा जामिनावर बाहेर होता. सुकेश हा जॅकलिनला चेन्नईमध्ये चार वेळा भेटला होता. या भेटींसाठी त्याने प्रायव्हेट जेटचीही व्यवस्था केली होती. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सुकेश चंद्रशेखर हा मिरर सेल्फी घेताना दिसत होता. या सेल्फीत तो जॅकलिनच्या गालावर चुंबन घेताना दिसत होता. त्यावेळी त्याच्या हातात आयफोन होता. याच मोबाईलद्वारे सुकेश चंद्रशेखरने इस्रायली सिमकार्ड वापरून खंडणी मागितली होती. सुकेश तुरुंगात असतानाही तोच मोबाईल वापरत होता.

Jacqueline Fernandez
काँग्रेसच्या गळाला दुसरा पाटीदार नेता; हार्दिक यांच्या 'एक्झिट'मागे नरेश पटेलांची 'एंट्री'?

जॅकलिन फर्नांडिस या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयासमोर (ईडी) गेल्या 20 ऑक्टोबरला हजर झाली होती. ईडीच्या पथकाकडून तिची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर मुख्य आरोपी आहे. सलग चार वेळा चौकशीला हजर होणे टाळल्यानंतर अखेर ईडीच्या दिल्ली कार्यालयात जॅकलिन हजर झाली होती. कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यातंर्गत जॅकलिनचा जबाब त्यावेळी नोंदवण्यात आल्याचे आला होता. जॅकलिनचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com