आर्यनची अटक महागात; मलिक यांच्यानंतर आता शाहरूख आणणार वानखेडेंना अडचणीत

अभिनेता शाहरुख खानने अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना अडचणीत आणण्याची तयारी केली आहे.
आर्यनची अटक महागात; मलिक यांच्यानंतर आता शाहरूख आणणार वानखेडेंना अडचणीत
Sameer Wankhede and Shahrukh Khan File Photo

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना उच्च न्यायालयाने (High Court) जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची नुकतीच मिळाली आहे. यात या प्रकरणाच्या तपासावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे आता अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याने अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना अडचणीत आणण्याची तयारी केली आहे.

आर्यनला अटक झाल्यापासून ते त्याची सुटका झाल्यानंतर आतापर्यंत शाहरूख खानने या प्रकरणावर मौन धारण केले आहे. या प्रकरणाच्या तपासावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्याने आता शाहरूखच्या वकिलांनी त्याला वानखेडेंवर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शाहरुख लवकरच वानखेडेंच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे जेरीस आलेल्या वानखेडेंच्या अडचणी आणखी वाढतील, असे दिसत आहे.

Sameer Wankhede and Shahrukh Khan
मुंबई पोलिसांनी थेट माजी प्रमुखांच्या घरावरच चिकटवला न्यायालयाचा आदेश!

उच्च न्यायालयाच्या आदेशात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, आर्यन, अरबाझ आणि मुनमुन यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केल्याचा एकही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कटाचा भाग ठरवणे शक्य नाही. तसेच, तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित वेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते हेसुद्धा स्पष्ट होत नाही.

Sameer Wankhede and Shahrukh Khan
ममतांच्या दिल्ली दौऱ्याचा मोठा गाजावाजा पण प्रवेश करणारे तिघेही माजी खासदार

तपास अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घेतलेल्या कबुलीजबाबावर एनसीबी विसंबून राहू शकत नाही. कारण हे कबुलीजबाब न्यायालयात ग्राह्य धरले जात नाहीत, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. उच्च न्यायालयानेच आता एनसीबीच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडून हा तपास सध्या काढून घेण्यात आला आहे. तसेच, त्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in