अमिर खानने घेतली दादा भुसेंची भेट; असा आहे 'प्लॅन'

अभिनेते अमिर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात पाणी बचतीची मोठी चळवळ उभी केली आहे.
Amir Khan, Dada Bhuse
Amir Khan, Dada BhuseSarkarnama

मुंबई : अभिनेते अमिर खान (Amir Khan) यांनी पाणी फाउंडेशनच्या (Pani Foundation) माध्यमातून राज्यात पाणी बचतीची मोठी चळवळ उभी केली आहे. या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील गावागावांत पोहचत पाणी जिरवण्यासाठी मोठं काम उभं केलं. आता इथंच न थांबता अमीर खान यांनी आता राज्यातील सोयाबीन (Soyabean) शेतीकडं आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.

राज्यातील सोयाबीन पीकाच्या वाढीसाठी अमीर खान यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सोयाबीनची शेती कशी करावी, उत्पादन कसे वाढावे यासाठी ऑनलाईन सोयाबीन शेती शाळा भरविली होती. मागील काही दिवसांपासून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. आता फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत नव्या सोयाबीन शेती कशी करावी, यासाठी ऑनलाईन पुस्तिका ही तयार केली आहे.

Amir Khan, Dada Bhuse
जयंतरावांनी भाजप नेत्याला पक्षप्रवेशासाठी पाच तास वाट बघायला लावली!

कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची भेट घेत अमीर खान यांनी या पुस्तिकेचे अनावरणही केले. सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पिकांपैकी एक पीक आहे. ज्या गावात पाणी फाऊंडेशन कार्यरत आहे, तेथील अनेक शेतकऱ्यांशी पाणी फाऊंडेशनने संवाद साधला आहे. अनेक शेतकरी सोयाबीनचे प्रति एकर 15-20 क्विंटल उत्पादन घेतात. काही विशिष्ट शेती पद्धतींचा अवलंब केल्यामुळे हे शक्य होत आहे. ही माहिती सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर याचे एकच उत्तर होते ते ज्ञान डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, असे अमीर खान यांनी सांगितले.

Amir Khan, Dada Bhuse
रशिया युक्रेन संघर्ष चिघळला: राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची मोठी घोषणा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संपर्क साधून डॉ. शरद गडाख यांनी आमच्या प्रस्तावाचे स्वागत केले. सोयाबीन शेतीच्या प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची टीम स्थापन केली. यामध्ये डॉ. मिलिंद देशमुख, डॉ.अनित दुर्गुडे, डॉ. नाद्रा भुते आणि सचिन महाजन हे या टीममध्ये आहेत. राहुरी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राचीही मदत झाली, अशी माहिती अमीर खान यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com