हिंदू महासंघाचा नवा फतवा; भगवे स्टिकर असलेल्या...

Hindu-muslim Politics| हिजाब, हनुमान चालिसा, रामजन्मभुमी, बाबरी मशिद प्रकरणांपासून हिंदूत्त्ववादी संघटना अधिक सक्रीय झाल्या आहेत.
Hindu-muslim Politics|
Hindu-muslim Politics|

मुंंबई : देशात हिंदूत्त्वाचा मुद्दा अधिकच तीव्र होत चालल्याचे दिसत आहे. हिजाब, हनुमान चालिसा, रामजन्मभुमी, बाबरी मशिद, प्रकरणांपासून हिंदूत्त्ववादी संघटना अधिक सक्रीय झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आता एक नवा फतवा काढला आहे. ज्या दुकानांवर भगवे स्टिकर असतील त्याच दुकानातून वस्तु खरेदी करण्याची आज शपथ घेतली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

''हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतली कि, भगवे स्टिकर ज्या दुकाना वर असेल त्याच दुकानातून वस्तू खरेदी करायच्या. म्हणजे थोडक्यात हिंदूंनी कुठल्याही इतर धर्मियांच्या दुकानात जायचे नाही., असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच, थोडक्यात बहिष्कार ...#वर्णवर्चस्ववाद #muslim #christian #buddhist #jain #sikh'' असेही त्यांनी म्हटले आहे.

Hindu-muslim Politics|
Gyanvapi mosque case : देवबंदच्या परिषदेत मौलाना मदनी यांना अश्रू अनावर..

देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राजधानी मुंंबई आणि पुण्यातही नव्या व्हेरीयंट रुग्ण सापडू लागले आहेत, असे असताना हिंदू महासंघाच्या या भूमिकेने देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.याबाबतही जितेंद्र आव्हाड यांनी शंका व्यक्त केली आहे.

''जे कोरोनाचे वॅक्सीन घेत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन हे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे मालक हे एक पारसी आहे आणि एक मुसलमान आहे. म्हणजे बहुतेक महासंघाचे कार्यकर्ते आता या लसी यापुढे घेणार नाहीत." अशी शंकाही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, चार-पाच महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हनुमान चालिसाचा नारा दिला. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अल्पसंख्यकांवर अन्यायाच्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. असे असताना आता इतर हिंदुत्ववादी संघटना हिंदू महासंघाने घेतलेल्या या भूमिकेला पाठिंबा देतात की विरोध करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com